गेल्या दहा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून यामध्ये लाखो हेक्टर जमीन मशागती विना पडून आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने रानामध्ये मशागतीसाठी जाणे शेतकऱ्यांना मुश्किलीचे झाले आहे. रान तयार नसल्यामुळे खरिपाची पिके घेणे वेळेवर होणार नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस पट्टा असल्याने या ऊस शेतीसाठी सदरचे वातावरण पोषक आहे त्यामुळे काही प्रमाणात ऊस उत्पादक शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते. दुसऱ्या बाजूला सांगली जिल्ह्यात द्राक्ष बाग शेती मोठ्या प्रमाणात असून नुकतीच या द्राक्ष बागांची छाटणी झाली असून त्याला फुटवे फुटले आहेत परंतु हे फुटवे या सतत पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व होत नाहीत. फुटवे परिपक्व होण्यासाठी उन्हाची आवश्यकता असते मात्र गेल्या दहा दिवसांपासून सततच्या पावसामुळे या द्राक्ष बागांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.