सांगलीतील चिंतामणी नगर भागामध्ये रेल्वे पूल काही महिन्यापूर्वीच बांधण्यात आले असून एक वर्षही झाले नसताना या पुलावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्याचा अंदाज न आल्याने, आणि याठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने अंधार असल्यामुळे अनेक वेळा अपघातही झाले आहेत. याला पूर्णपणे राज्य शासन, रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनोज भिसे आणि नागरिकांनी आज या पुलावर केलेल्या निषेध आंदोलनावेळी केलाय. सदर पुलावर स्ट्रीट लाईट नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने याचा निषेध म्हणून पुलावर मेणबत्त्या लावून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.