पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणाऱ्या आमदाराच्या घरात उमेदवारी देऊन महायुतीने जनतेचा रोष ओढावून घेतला आहे. असं महेश गायकवाड यांनी महायुतीवर ताशरे ओढले आहेत.
शिवसेना शिंदे गट बंडखोर महेश गायकवाड यांनी केला अपक्ष उमेदवार अर्ज दाखल
कल्याण पूर्वेचे महायुतीतील आमदार महेश गायकवाड यांनी कायमच सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी विरोध दर्शवला होता. त्यामुळे कल्याण विधानसभा मतदार संघातील अंतर्गत वाद समोर येताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार महेश गायकवाड यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढली.