देशात जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा आम्ही कॉलेज मध्ये होतो आणि याविरोधात लढायचे ठरवले होते. या देशात काँग्रेस पक्षात घराणेशाही होती आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांना पाठबळ दिले. आज शिवसेना फुटली खरतर बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना उद्धव ठाकरेनी ठेवली नाही आणि त्यामुळे मी शिंदे सेनेकडे गेलो.
ज्या सिस्टीमचा बाळासाहेब ठाकरे यांनी कायम विरोध केला ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्या सोबतच उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केली हे आवडले नाही आणि म्हणून मी उद्धव ठाकरेंना सोडले आणि खऱ्या शिवसेनेत गेलो असे ते सांगतात त्यांच्याशी बातचीत केली नवराष्ट्रचे प्रतिनिधी विजय कवळे यांनी.