आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आनंद आश्रम येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस खासदार नरेश मस्के, सचिव राम रेपाळे, माजी आमदार रवींद्र फाटक, महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी महापौर अशोक वैती आणि शहराध्यक्ष हेमंत पवार यांच्यासह विविध विधानसभा क्षेत्रांतील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत येणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लोकोपयोगी उपक्रम राबवण्यावर चर्चा झाली. तसेच ठाणे महानगरपालिकेत जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्यासाठी रणनीती आखण्यात आली.