पीओपीच्या गणेशमूर्तींवर आलेल्या बंदीमुळे रायगड जिल्ह्यातील जे गणेशमूर्तींचे माहेरघर समजले जाते अशा पेण तालुक्यातील कारखानदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ही बंदी कायमस्वरूपी उठवावी यासंदर्भातील मुंबई येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी पेण तालुक्यातील हजारो कारखानदार रवाना होणार आहेत. त्याची जय्यत तयारी या कारखानदारांची सुरू झाली आहे. दरम्यान या मेळाव्यासाठी केवळ पुरुष कामगार नाही तर महिला कारखानदार देखील आपली उपस्थिती दर्शविणार आहेत. दरम्यान मूर्तिकारांच्या या लढ्यात सरकार पूर्णपणे मूर्तिकारांच्या पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जाणार असल्याचे रायगड जिल्ह्याचे संपर्कमंत्री आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्लॅस्टरच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने या मूर्तींवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र राज्य सरकार महाराष्ट्रातील गणेश मूर्तीकरांसोबत आहेत असे आश्वासन रायगडचे संपर्क मंत्री आशिष शेलार, खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित गणेश मूर्तीकरांना दिला आहे.