फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक विचित्र आणि थक्क करणारे प्रकार व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल अशा घटना तुम्ही इथे नक्कीच पाहिल्या असतील मात्र आज आम्ही तुमच्यासाठी जो व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्यातील दृश्ये तुम्ही आजवर कधीच पाहिले तर नसतीलच पण याचा कधी तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडिओ एका मुलाचा असून यातील त्याच्या दाव्याने संपूर्ण जीवशास्त्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकेच काय तर लोकही यातील दृश्ये पाहून आता कोड्यात पडली आहेत. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक व्यक्ती व्हिडिओ बनवत मुलाशी संवाद साधताना दिसून येतो. व्यक्ती मुलाला विचारतो की, तू या मुलाचा बाप आहेस का ज्यावर मुलगा हो असे उत्तर देतो. यावर व्यक्ती हादरतो आणि त्याला आईची शप्पथ घ्यायला सांगतो तर मुलगा तेही करतो. हे कसं शक्य आहे तू स्वतःच एक मुलगा आहेस आणि तू मुलाला जन्म दिला हे कसे शक्य आहे असा प्रश्न करत व्यक्ती मुलाला तुझे लग्न झाले आहे का? असा प्रश्न करतो मग मुलगा म्हणतो, हो माझी बायको घरी आहे. मुलगा व्यक्तीला आपल्या बायकोचा फोटोही दाखवतो आणि १० वर्षांचा असताना त्याचे लग्न झाले असे सांगतो. देवा शप्पथ, अल्लाह शप्पथ अशा अनेक शपथा खाऊन तो व्यक्तीला आपले लग्न झाले असून त्याला खरंच १० वर्षांचा मुलगा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. अखेर व्यक्ती हे सर्व ऐकून स्तब्ध होतो आणि त्याला हे खरंच पटलं असे भासवून देतो पण व्यक्तीच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत प्रश्नचिन्ह आणि आश्चर्य दिसून येत असते.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून मुलाच्या या दाव्याने संपूर्ण सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. कोड्यात पडलेले युजर्स कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अशाप्रकारे मी माझ्या जिवलग मित्राची ओळख इतरांसमोर करून देतो” तर आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जर या मुलाचे मूल १० वर्षांचे असेल, तर लग्नाच्या वेळी मुलाचे वडील १० वर्षांचे होते, तर मुलाचे वय १० कसे झाले? यानुसार, त्या मुलाचे लग्न ५ वर्षांच्या वयात झाले असते….भाऊ हे काय आहे”. हा व्हायरल व्हिडिओ @cringecommets नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.