(फोटो सौजन्य: X)
लग्नसमारंभ म्हटलं की, शाही जेवणाचा थाट हा असणारच. एकंदरीतच लग्नकार्यात एक वेगळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते, सर्वत्र आनंद आणि लग्नाचा जल्लोष मात्र अशाच एक लग्नातील एक हृदयद्रावक दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. एकीकडे लग्नाचा उत्साह आणि दुसरीकडे चिमुकलीचे ती वाईट अवस्था पाहून सर्वच भावुक झाले. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यात नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओ एका लग्नसमारंभातील असल्याचे दिसून येत आहे. यावेळी लोक उत्साहाने लग्नाचा आनंद मिरवत असतात तर दुसरीकडे एक गरीब मुलगी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी इथे ठेवलेल्या खरकट्या प्लॅटिनमधून उष्ट अन्न खाताना दिसली. काही मिनिटांपूर्वी पाहुण्यांनी जे खाल्ले होते आणि फेकून दिले होते तेच अन्न मुलगी टिपून टिपून खाते. मुलीच्या चेहऱ्यावर भुकेचा आक्रमकपणा नव्हता, फक्त एक नेहमीची सहजता होती जणू काही हे सर्व तिच्यासाठी सामान्य गोष्ट आहे.
ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्याचे डोळे पाणावले. चमकदार कपडे, सजवलेले टेबल, भव्य सजावट आणि चकाचक जागेत, एक लहान मुलगी कचऱ्यात टाकलेल्या अन्नाने पोट भरत आहे हे पाहून अनेकांना वाईट वाटले. एकीकडे आपला देश प्रगत होत आहे मात्र देशातील गरीब लोक आणखीन मागे पडत आहेत. संपूर्ण देशाला जीडीपीमध्ये झालेल्या वाढीचा अभिमान असताना, हे दृश्य आपल्याला आठवण करून देते की गरिबी आणि उपासमार अजूनही आपल्या दाराशी उभी आहे. मुख्य म्हणजे, काहीलोक चिमुकलीला असे करताना पाहतात मात्र कोणीही यावर काहीच बोलत नाही. कदाचित लोकांना हे दृश्य पाहण्याची आता सवय झाली असावी.
India Becomes World’s 4th Largest Economy, Surpasses Japan ! 🙏 pic.twitter.com/hO2VEK1el4
— Sakshi (@ShadowSakshi) May 27, 2025
दरम्यान घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. व्हिडिओला @ShadowSakshi नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “याला जबाबदार कोण? केंद्र सरकारची भूमिका काय आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “२०२५ मध्येही असे व्हिडिओ पाहणे वेदनादायक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.