(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला थक्क करून जातात तर कधी आश्चर्याचा धक्का देतात काही व्हिडिओ तर असतात की त्यातील दृश्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. आजकाल प्रत्येकजण आपल्या मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहे, ज्यामुळे हे व्हिडिओ कमी वेळातच अनेक लोकांद्वारे पाहिले जातात. आताही इंटरनेटवर एक मजेदार व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यातील काकांच्या कृत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
काही लोकांना नको त्या गोष्टी करण्याची फार आवड असते, मात्र त्यांचा हा खोडसाळपणा इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करते. सध्या असाच ए व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यात एक व्यक्ती खाटेवर आरामात झोपलेले दिसून आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खाटेवर झोपण्याबद्दल व्हायरल होण्यात एवढे मोठे काय आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो की तो माणूस त्याच्या घराच्या आत असलेल्या खाटेवर झोपलेला नाही, तर तो रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या खाटेवर झोपलेला दिसतो. विशेष म्हणजे काकांच्या आजूबाजूने गाड्या जात असतात मात्र मनात कोणतेही भय न ठेवता काका मजेत आपली खाट रस्तावर लावतात आणि तिथे गपचूप झोपून जातात. काकांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक त्यांच्या या कृत्यावरून त्यांना ,मिश्किल रूपात सलामी देत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @kaif_pasha_5270 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चित्रपट तर अजून बाकी आहे मित्रा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता व्हिडिओ पाहून पोलीस कारवाई करतील” , आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पुढच्या भागासाठी मी उत्सुक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.