जगातील अनेक रहस्य हे अजून उलगडलेले नाही. त्यातीलच एक म्हणजे ममी. आजही ममीबाबतचे अनेक रहस्यांचा उलगडा करण्याचे काम शास्त्रज्ञ करत आहेत. जगभर प्रसिद्ध असणाऱ्या इजिप्तशियन ममीवर आजवर अनेक चित्रपट बनले आणि ते हिटदेखील झाले. ममीचा इतिहास ऐकूनच अनेकांच्या अंगावर काटा येऊ लागतो. पूर्वीच्या वेळी इजिप्तमध्ये कोणी कोणता गुन्हा केला की त्याला जिवंत ममी बनवले जायचे आणि अत्यंत वेदनादायी मरण त्या व्यक्तीनां दिले जायचे. जगभरातील अनेक शास्त्रज्ञ ममीचा शोध घेत आहेत आणि त्यांचा सखोल अभ्यास करत आहेत.
यातच मागे शास्त्रज्ञांना एक ममी आढळली होती मात्र जेव्हा त्यांनी तिची परिस्थिती पाहिली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ही गोष्ट आहे 1935 सालची, जेव्हा शास्त्रज्ञांना एक प्राचीन ममी सापडली होती. त्या ममीची अवस्था इतकी खराब होती की तिला पाहूनच तिला किती दुःखद मारत प्राप्त झाले याचा अंदाज लावण्यात येऊ शकतो. अभ्यासानंतर समजले की, ती ममी सुमारे 3500 वर्षे जुनी होती. त्याचे परीक्षण केल्यावर शास्त्रज्ञांना अनेक आश्चर्यकारक गोष्टी उलगडल्या.
हेदेखील वाचा – लग्नाच्या पहिल्या दिवशी घरी येताच वधू-वराने शेअर केला Kissing Video! सोशल मीडियावर होत आहे Viral
डेली मेल वेबसाइटनुसार, 1935 साली काही शास्त्रज्ञांनी इजिप्तमधील सेनमुट नावाच्या एका महान आर्किटेक्टच्या उत्खनन केले. सेनमुटचा मृत्यू इसवी सनपूर्व 1464 मध्ये झाला होता. या उत्खननावेळी त्याच्या कबरीखाली एक लाकडी शवपेटी सापडली, ज्यामध्ये एका महिलेची ममी ठेवण्यात आली होती. महिलेच्या डोक्यावर काळा विग होता आणि तिने स्कॅरब कीटकांच्या आकाराच्या चांदीच्या आणि सोन्याच्या अंगठ्या घातल्या होत्या. मात्र त्या महिलेची अवस्था आणि तिचे हावभाव पाहून शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्काच बसला.
ममीला पाहताच समजले की तिला दुःखद मृत्यू प्राप्त झाले आहेत. त्या ममीचं तोंड उघडे होते. शास्त्रज्ञांना ही ममी पाहून वाटले की, महिलेला मरताना प्रचंड वेदना झाल्या असाव्यात. याच कारणास्तव मामीचे नाव ‘स्क्रीमिंग वुमन’ ठेवण्यात आले. आता वैज्ञानिकांनी या ममीचं जीवन आणि मृत्यू जाणून घेण्यासाठी प्रगत वैज्ञानिक तंत्रांचा वापर केला आहे. या प्रगत स्कॅनिंग तंत्रातून असे दिसून आले आहे की, ती महिला अशाच अवस्थेत झोपली असेल, तिचे पाय सरळ असतील आणि हात तिच्या मांड्यांवर दुमडले गेले असतील. तिचे अनेक दात तुटले होते. जे कदाचित मृत्यूआधीच पडले असावे. तिची उंची 5.05 फूट इतकी असावी.
सिटी इमेजवरून दिसून आले की, ती महिला मृत्यूच्या वेळी ती 48 वर्षांची असावी. तिला मणक्यात सांधेदुखीचाही हलका त्रास होता. या अभ्यासात असेही समजले की, त्या महिलेवर जूनिपर आणि फ्रँकिनसेन्स सारख्या पदार्थांचा लेप केलेला असावा, जे खूप महाग आहेत आणि ते बाहेरील देशातून इजिप्तमध्ये आणले गेले असावे. शास्त्रज्ञांचा असाही दावा आहे की, महिलेला ज्याप्रकारे महाग दुर्मिळ पदार्थांनी सुशोभित केले होते, त्यावरून असे म्हणता येईल की घाईत तिला ममी बनवण्यात आले असावे. त्यामुळेच ममी बनवण्याच्या प्रक्रियेवेळी तिचे तोंड उघडे होते, जे ते बंद करायला विसरले असावे.
कायरो युनिव्हर्सिटीच्या डॉ. सहार सलीम यांनी सांगितले की, महिलेचे तोंड उघडे राहणे हे कॅडेव्हरिक स्पॅस्ममुळे होऊ शकते. ही एक प्रकारची परिस्थिती आहे ज्यात, मृत्यूच्या वेळी एखाद्या व्यक्तीचे स्नायू अचानक कडक बनतात. जेव्हा मृत्यू फार वेदनादायी आणि भयानक असतो तेव्हा असे होण्याची शक्यता असते. याचाच अर्थ असा होतो की, त्या महिलेला असा मृत्यू आला असावा ज्यात तिला फार वेदना झाल्या असाव्यात आणि असह्य वेदनांमुळेच ती मोठमोठ्याने किंचाळली असावी आणि त्यामुळेच तिचे तोंड बंद करता आले नसावे. महिलेच्या मृत्यूचे कारण तर या अभ्यासात समजून आले नाही मात्र तिचे सर्व अवयव तिच्या शरीराशी जोडले गेलेले होते, जे फार आश्चर्यकारक आहे कारण त्यावेळी ममी बनवताना व्यतीच्या हृदयाशिवाय इतर सर्व अवयव काढले जायचे.