(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर म्हशीला चोरी करताना पाहून यूजर्स अवाक् झाले तर काहींनी यावर मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. व्हिडिओत आपण पाहू शकता यात दोन म्हशी रस्त्यावरून जोरात धावताना दिसतात. दरम्यान, एका म्हशीच्या गळ्यात बांधलेला दोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकमध्ये अडकतो आणि बाईक म्हशीसोबतच घरंगळत तिच्या मागे मागे निघून जाते. मुख्य म्हणजे, म्हैस इतकी शक्तीशाली होती की न थांबता ती बाईकलाही घेऊन पुढे पळत गेली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की म्हशी एखाद्या हलक्या खेळण्यासारखी बाईकसोबत पुढे पळत आहे. काहीवेळ लोकांना स्तब्ध करणाऱ्या या दृश्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यातील दृश्यांनी सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आणले आहे.
हा व्हिडिओ @dramebaazchhori99 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जे लोक त्यांच्या बाईक घराबाहेर ठेवतात त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ अरे देवा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, हा कोणत्या प्रकारचा चोर होता हे मला समजले नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






