(फोटो सौजन्य: Instagram)
जंगलातील धोकायदायक प्राण्यांची नावे घेतली की त्यात किंग कोब्राचे नाव हे येतेच. किंग कोब्रा जंगलातील एक धोकादायक प्राणी असून तो आपल्या विषारी हल्ल्यासाठी ओळखला जातो. आपल्या विषाने कोब्रा कुणालाही मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो अशात माणूसच काय तर जंगलातले मोठमोठे प्राणीही त्याला घाबरून असतात. अशातच आता किंग कोब्राचा एक क्युट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो सर्वांना खळखळून हसवत आहे. यात एका व्यक्तीने चक्क किंग कोब्राला माणसांप्रमाणे गोंडस टोपी घातल्याचे दिसून आले, ज्याने कोब्राचा एकूणच संपूर्ण लूकच बदलला. कोब्राचा हा नवा लूक आता अनेकांची मने जिंकत आहे.
काय दिसून आले व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये एका इन्फ्लुएंसरने किंग कोब्रासोबत इतकी मजा केली आहे की ते पाहिल्यानंतर लोक आता त्याला किंग कोब्रा Pookie म्हणू लागले आहेत. त्या माणसाने किंग कोब्राला लोकरीची टोपी घातल्याचे दिसून येते. इंडोनेशियन इन्फ्लुएंसर सहबत आलम दररोज आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सापांसोबतचे त्यांचे व्हिडिओ पोस्ट करत असतो. पण यावेळी त्याने दाखवलेल्या किंग कोब्राचा नवा अवतार आता लोकांना आश्चर्यचकित करत आहे तर काही लोक कोब्राला अशा रूपात पाहून हास्याने लोटपोट होत आहेत.
जोडीदार असावा तर असा! शॉक लागून हात गमावले तरीही तिने सोडली नाही साथ…; तरुणाने घेतलेला उखाणा व्हायरल
टोपी घातलेल्या कोब्राच्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांच्या व्युज मिळाल्या असून हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किंग कोब्रा आहे की क्वीन कोब्रा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नागाच्या संयमाची परीक्षा घेऊ नका” तर आणखीन एका युजरने लिहिले आहे की, “एक दिवस तू व्हिडिओ टाकणे बंद करणार आणि आम्हाला समजून जाईल असे का घडले ते”. दरम्यान हा व्हिडिओ @sahabatalamreal नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.