(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. यात बऱ्याचदा प्राण्यांच्या आयुष्याशी निगडित व्हिडिओ देखील शेअर केले जातात, जे नेहमीच आपल्याला थक्क करून जातात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने शेअर केला जात आहे यात एक व्यक्ती चक्क सिंहाला हातात घेऊन पॅराग्लायडिंग करताना दिसून आला. जमिनीवरील जंगलाच्या या राजाला असे हवेत उडताना पाहून सर्वच हादरले. शिवाय व्हिडिओतील सिंहाची प्रतिक्रिया देखील फारच रंजक होती ज्याने या व्हिडिओला आणखीन खास बनवले.
काय दिसले व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सर्वांनाच थक्क केले आहे. यात एक माणूस पॅराग्लायडिंग करत होता मात्र यातील विशेष आकर्षण ठरला सिंह! माणसांना पॅराग्लायडिंग करताना तर आपण अनेकदा पाहिले आहे मात्र सिंहाला असे हवेत उडताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे दृश्य असे होते की ज्याने ते पाहिले त्याचे डोळे आश्चर्याने उघडे राहिले. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, सिंह पॅराग्लायडिंग हार्नेसने घट्ट बांधलेला आहे. तो गर्जना करत नाहीये आणि घाबरलेलाही दिसत नाहीये. उंच पर्वतांकडे पाहत असताना त्याचा चेहरा शांत आणि राजेशाही दिसतो.
जोडीदार असावा तर असा! शॉक लागून हात गमावले तरीही तिने सोडली नाही साथ…; तरुणाने घेतलेला उखाणा व्हायरल
हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यासोबतच काहींनी सिंहाच्या सुरक्षिततेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडिओला @mayankrai00 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी या अनोख्या पॅराग्लायडिंगवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तो काहीच घाबरला नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याचे मित्र त्याच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.