3 Idiots स्टाईलमध्ये स्पीच! आफ्रिकन विद्यार्थ्याच्या भाषणाने विद्यार्थी प्रेक्षक हसून लोटपोट, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या अलीगड मुस्लिम विद्यापीठातील (AMU) सांस्कृतिक कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. अय्यूबा नावाच्या आफ्रिकन विद्यार्थ्याने विद्यार्थी संघटनेच्या सचिवाच्या भूमिकेचा रोल प्ले केला होता. यावेळी त्याने आपल्या भाषणात हॉस्टेलमधील समस्यांवर चतुल लिंगम स्टाईलमध्ये भाष्य केले. त्याचे भाषण ऐकून सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांनी आणि शिट्ट्या वाजवल्या यामुळे संपूर्ण परिसर दुमदमून गेला होता. विद्यार्थी प्रेक्षक लोटपोट झाले होते. त्याने अत्यंत मजेशीर शैलीत या सर्व समस्या मांडल्या आहेत. त्याचे भाषण ऐकून विद्यार्थ्यांनी अय्यूबा जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असेलाल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर @gazigraphy_ शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने रँचो परत आला असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने कमिंटीग स्टाईल चतुरसारखीच आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर हास्याचा कल्लोळ उडाला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






