सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई : प्रेक्षकांची चाहती जोडी रितेश-जिनिलिया देशमुख सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. हे जोडपं बॉलीवुड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वात सतत चर्चेत राहते. रितेश आणि जिनिलीया सोशल मीडियावरही सक्रिय असतात. अलीकडेच त्यांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ज्यामध्ये रितेशचा संवाद असा आहे की, ‘तुला काय वाटतं, यावेळी निवडणूक कोण जिंकेल?’ तेव्हा जिनिलिया असं उत्तर देते की, ‘अरे, कोणीही जिंकू दे… तुझ्यावर तर माझंच राज्य असेल’. इतर रीलप्रमाणे या रीलमध्ये जिनिलिया आणि रितेश यांचे हावभावही खूप मजेशीर आहेत. हे दोघे नेहमीच ट्रेंडिंग आणि मजेशीर ऑडिओवर इन्स्टाग्राम रील पोस्ट करत असतात.
कमेंट्सचा पाऊस
रितेशने दिलेल्या कॅप्शनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अब की बार नाही, हर बार बिवी की सरकार… इलेक्शन २०२४’. या रीलमध्ये रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओवर कमेंट आणि लाइकचा पाऊस पडला आहे. ‘द रिअल होम मिनिस्टर’, ‘हर बार जिनिलिया सरकार’., ‘कसं, वहिनी म्हणतील तसं’, अश्या चाहत्यांनी काही कमेंट्स केल्या आहेत.