(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला हसू आणतात काही थक्क करतात तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात. स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक इथे अनेक अनोखे प्रकार करताना दिसून येतात. त्यातच आता अशीच एक रील सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला खळखळून हसवतील. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही आजवर इथे अजब-गजब व्हिडिओज पाहिले असतील मात्र आजचा व्हिडिओ जरा आणखीनच खास आहे. व्हिडिओतील काकांचा पराक्रम तुम्हाला थक्क तर करेलच पण त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर हसूही आणेल. चला आता यात काय दिसलं ते जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ लहान आहे पण मजेदार आहे. व्हिडिओमध्ये एक काकू एखादा पक्षी आपल्या पंखांनी जसा उडतो तसा हवेत आपला हात हलवत अवकाशात उडताना दिसून येत आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकले व्हिडिओत काकू हवेत उडत आहेत. मात्र हे दृश्य खरे नसून यात एडिटिंग केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. व्हिडिओत काकू आनंदाने अवकाशात उडत आहेत, यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य दिसून येते. व्हिडिओतील हे दृश्य खूपच हास्यास्पद असून लोकांनी याची चांगलीच मजा लुटली आहे. लहानपणी हवेत उडण्याचे आपले हे स्वप्न काकूंनी एडिटिंगच्या मदतीने पूर्ण केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.
इनके हाथ से मोबाइल फोन छीन लो यार भाई 😭 pic.twitter.com/LicZXdBnME
— Byomkesh (@byomkesbakshy) June 11, 2025
काकूंचा हा भन्नाट व्हिडिओ @byomkesbakshy नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून हजारो लोकांनी व्हिडिओला आतापर्यंत पाहिले आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, ‘यांच्याकडून फोन हिसकावून घ्या’ असे लिहिले आहे. अनेक युजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये काकूंच्या या पराक्रमावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मैं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला रात्री असेच उडण्याचे स्वप्न दिसते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.