(फोटो सौजन्य:X)
सोशल मीडियावर सध्या एका भीषण घटनेने दखल घेतली आहे. यात अवघ्या काही सेकंदातच 300 सिलेंडर फुटण्याची घटना घडून आली आहे. एकूणच अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृश्ये आता लोकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडून आली. घटनेत नक्की काय घडून आले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
ही घटना उत्तर प्रदेशच्या बरेली येथे सोमवारी दुपारच्या सुमारास एक थरारक घटना घडून आली, यात बिथरी चैनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील राजौ पारसपूर येथील महालक्ष्मी गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने एक भीषण आग प्रज्वलित झाली. ही आग इतकी मोठी होती की तिने गोदामाला अक्षरशः जळून खाक केले. या भयंकर घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला. अवघ्या 30-40 सेकंदातच हा स्फोट घडून आला, यात एकूण 40 स्फोट झाले ज्यात 300 सिलिंडर फुटल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर अग्निशमन दलासह पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी गोदामात सिलिंडरने भरलेला ट्रक उभा होता. ट्रकच्या केबिनला अचानक आग लागली, त्यामुळे त्यात ठेवलेला सिलेंडर फुटला. त्यानंतर ट्रक आणि गॅस एजन्सीच्या गोदामाला आग लागली. सिलिंडर फुटल्यामुळे बराच वेळ स्फोट होत राहिले. या घटनेने राजू पारसपूर गावात भीती पसरली. गावकरी घराबाहेर पडले. गावातून बाहेर आल्यावर त्यांना गॅस गोदामात स्फोट होत असल्याचे समजले. ज्या गॅस एजन्सीचे गोदाम आग लागली ते सोमवारी बंद होते. गोदामावर फक्त वॉचमन आणि ट्रक चालक होते. दोघांनी पळून आपला जीव वाचवला. गोदाम लोकवस्तीपासून दूर बांधण्यात आल्याने जीवितहानी टळली. माहिती मिळताच शहरातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Bareilly, UP: A massive fire at Mahalaxmi Indane Gas Warehouse led to gas cylinder explosions, spreading flames to nearby fields. Cylinders flew up to 1 km before detonating. Police and fire brigade controlled the fire. A gas-laden truck was completely destroyed pic.twitter.com/qxRRCwZenq
— IANS (@ians_india) March 24, 2025
या भीषण घटनेचा व्हिडिओ @ians_india नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीही माहिती देण्यात आली आहे तर अनेक युजर्सने या व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “दुःखद” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जीवित हानी नाही झाली ना”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.