(फोटो सौजन्य
स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक इंटरनेटवर अनेक विचित्र आणि नवनवीन प्रकार करताना दिसून येतात. त्यांचा हा प्रकार कधी कधी यशस्वी होतो तर कधीकधी त्यांच्या जीवावर बेततो. अनेकदा लोक नको ते जीवघेणे प्रकार करायला जातात आणि यात स्वतःचे नुकसान करून बसतात, नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतही असेच काहीसे दृश्य दिसून आले, ज्यात एक सायकलस्वार पर्वतांमध्ये एक धोकादायक स्टंट करायला जातो मात्र क्षणातच सर्व चित्र पालटते आणि नको ते घडून बसते. घटनेत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक स्वार धोकादायक डोंगरावर स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हे दृश्य इतकं भितीदायक आहे की ते पाहून लोक थक्क होतात. या अपघातातील दृश्ये पाहून अनेकजण हैराण झाले आणि हा व्हिडिओ वेगाने शेअर करू लागले. व्हिडिओमध्ये दुचाकीस्वार उंच आणि धोकादायक डोंगरावर बाईकवर स्टंट करत आहे. तो वेगाने दुचाकी चालवतो आणि धोकादायक उतारांवर स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. पण अचानक त्याच्याकडून चूक होते आणि त्याचा तोल बिघडतो. यानंतर तो दुचाकीसह उंचावरून खाली घसरतो आणि झाडांच्या झुडपात जाऊन पडतो. हे दृश्य इतकं भीषण आहे की पाहणाऱ्यांचा श्वास थांबला. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
हा व्हिडिओ केवळ घाबरवणारा नाही तर एक मोठा धडाही देतो. धोकादायक स्टंट करणे जीवघेणे असू शकते आणि अशी जोखीम घेण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे फार गरजेचे असते. हा अपघात अनेक स्टंटबाजी करणाऱ्या लोकांसाठी एक धडा आहे की स्टंट करताना नेहमी प्रथम आपल्या सुरक्षेचा विचार करावा. नको ते प्रकार आपल्या जीवावर बेतू शकतात. अशा अनेक घटना सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाल्या आहेत, लोकांनी या घटनांमधून याचे गांभीर्य जाणून घ्यावे आणि असे स्टंट्स करणे टाळावे.
Watch this guy fall off his mountain bike down a big hill – POV#Mountaibike #Accident pic.twitter.com/tMIYDmuAyB
— Indiana Bones (@_Indiana_Bones) March 23, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @_Indiana_Bones नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून तो वेगाने शेअर केला जात आहे. बऱ्याच युजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत देखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तो खूप वाईटरित्या पडला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप धोकादायक”, आणखीन एका युजरन लिहिले आहे, “ओएमजी हे क्रेझी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.