फोटो सौैजन्य - सोशल मीडिया
NEET Paper Leak 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द केल्याबद्दल देशभर खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास आता केंद्रिय अन्वेषण विभाग (CBI) कडे सोपवण्यात आला असून सीबीआयने आपली सर्व पथके सक्रिय केली आहेत. तसेच ज्या ठिकाणी पेपर फुटल्याचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी तपास यंत्रणा शोध घेत आहे.
सीबीआय सातत्याने राज्य पोलीस यंत्रणाच्या संपर्कात असल्याने आतापर्यंत झालेला तपास आणि अटक करण्यात आलेले आरोपी यांची सीबीआयला माहिती सहज मिळवता येईल. आतापर्यंत विविध राज्यातून अनेक संशियितांना ताब्यात घेण्यात आले असून सीबीआय अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. हा नेटवर्क किती मोठा आहे ?आणि त्यामागे नेमके कोण आहे ? याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे.
NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?
सीबीआय या प्रकरणाकडे सामान्य पेपरफुटी म्हणून नाही तर ‘संघटित गुन्हेगारी’ (Organized Crime) म्हणून पाहत आहे. यामुळे सीबीआयने यापूर्वीच्या नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकांशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घेतला आहे. तसेच ‘बिहार मॉड्युल’शी संबंधित जुन्या प्रकरणांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. जेणेकरून यावेळी तोच पॅटर्न वापरला गेला आहे की नवीन टोळी सक्रिय झाली आहे हे स्पष्ट होईल.
या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी सीबीआयने स्वतंत्र्य पथके तयार केली आहेत. त्यामध्ये सायबर टीमचाही समावेश आहे.
टेलिग्राम मेसेजेसची तपासणी: सायबर टीम टेलीग्रामवरील मेसेजेसची बारकाईने तपासणी करत आहे हे मेसेजेस कोणी पाठवले? कोणत्या अकाउंटवरून पाठवले आणि सर्वात आधी पेपर कुठे शेअर झाला? याचा शोध घेतला जात आहे.
मास्टरमाइंडचा शोध: तसेच या प्रकरणातील मुख्य सुत्रधारापर्यंत (Mastermind) पोहचण्यासाठी डिजिटल पुराव्यांची मदत घेतली जात आहे.
सध्या तपास वेगाने सुरू असून लवकरच या घोटाळ्यातील मुख्य आरोपींना अटक करून त्याच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.






