(फोटो सौजन्य – X)
आपल्या जगात अनेक अद्भुत चमत्कार घडत असतात, ज्यापासून आपण अज्ञात आहोत. जगाच्या कानाकोपऱ्यातून या अनोख्या गोष्टी नेहमीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या डोळ्यासमोर येतात. हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी शेअर केल्या जातात. अशा गोष्टी ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. आताही इथे एक असेच दृश्य शेअर करण्यात आले आहे, जे पाहून आपले डोळे खुलेच्या खुले राहतील. यात सूर्याचे अनोखे रूप दाखवण्यात आले आहे जे आजवर कुणीही पाहिले नसावे. चला तर मग यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
तुफान राडा! कॉलेज कॅम्पसमध्येच भिडल्या तरुणी; एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या अन्…, Video Viral
काय दिसले व्हिडिओत?
सूर्य हा किती गरम असतो किंवा ज्वालांनी भरलेला असतो हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. मात्र तुम्ही वास्तविक, सूर्याला कधी जळताना पाहिला आहे का? सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तुम्हाला सूर्य जळणाऱ्या ज्वलंत ज्वालांसारखा धगधगताना दिसून येईल. हा व्हिडिओ अनोखा असून यातील दृश्य आता लोकांना अचंबित करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बर्फाळ पर्वत दिसून येत आहेत आणि याच्या मागेच जर आपण पाहिले तर पार्वतीच्या मागून काही आगीच्या ज्वाळा जळताना दिसून येत आहेत. हे दृश्य पाहून अनेकांना सुरुवातील हे भ्रम असल्यासारखे वाटले तर काहींना हा ज्वालामुखीचा उद्रेक वाटला पण तसे नाही. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, हे अद्भुत दृश्य चीनमधील मेली स्नो माउंटनचे आहे. ढग आणि मावळत्या सूर्याचे मिश्रण लोकांच्या मनात भ्रम निर्माण करते.
A combination of orographic clouds and the setting sun creates the illusion of flames on the Meili Snow Mountains in China.pic.twitter.com/YgOHbuWGL5
— Wonder of Science (@wonderofscience) April 26, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @wonderofscience नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा दृश्य ऑरोग्राफिक ढगांमुळे आहे, म्हणजेच हवेच्या दाबामुळे आणि आर्द्रतेमुळे ढग तयार होतात आणि हा भ्रम मावळत्या सूर्यामुळे निर्माण होतो. ढगांमुळे, सूर्यप्रकाश ज्वालांसारखा दिसतो. व्हिडिओवर हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये या अद्भुत दृश्यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “खूप सुंदर” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो एक अद्भुत सूर्यास्त आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिबेटी संस्कृतीत पवित्र असलेल्या मेली स्नो पर्वतांवर स्थानिक श्रद्धा आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव चढाईवर बंदी घालण्यात आली आहे, असे डेकिन सरकारने म्हटले आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.