(फोटो सौजन्य: X)
अनेकदा आपल्या डोळ्यांसमोर अशा काही घटना येतात की त्यांना पाहताच आपण खरंच कलियुगात जन्म घेतला आहे याची जाणीव होते. दिवसेंदिवस कोणत्या ना कोणत्या घटना समोर येतात ज्या माणसाच्या क्रूरतेचा इशारा दर्शवतात. सोशल मीडियावरही यासंबंधीचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात आणि आताही असेच काहीसे घडून आले आहे. मध्य प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात काही लोक एका अपंग व्यक्तीला अर्धनग्न करत बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. या घटनेचा फुटेज आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
आई शेवटी आईच असते! पिल्लासाठी वाघाशी लढली अन् जंगलाच्या राजाला असं पळवलं… लढतीचा थरारक Video Viral
नक्की काय घडलं?
ही घटना बुधवारी मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यात घडून आली ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार, यात एका अपंग व्यक्तीला काही कारणास्तव अर्धनग्न करत काठीने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. FPJच्या वृत्तानुसार, हे प्रकरण जुझार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे आणि पीडित एक विकलांग दुकानदार असल्याचे सांगितले जात आहे.
#WATCH | Physically Disabled Man Beaten With Sticks Over Unknown Reasons In MP’s Chhatarpur#MadhyaPradesh #MPNews pic.twitter.com/gQYYDEPL6W — Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) July 9, 2025
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, दुकानदार अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे. एका व्यक्तीने त्याला पकडून ठेवले आहे तर दुसरा व्यक्ती त्याला काठीने मारत आहे. पीडित व्यक्ती ओरडताना आणि त्याला वाचवण्याची विनंती करताना देखील दिसून येतो. पीडित व्यक्ती हा अपंग असून स्थानिकांनी काही अज्ञात वादावरून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. माहितीनुसार, पीडितांच्या कुटूंबियांनी आरोपींवर आता कठोर कारवाईची मागणी केली आहे तर या घटनेमुळे स्थानिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे. घटनेचा हा व्हिडिओ @FreePressMP या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून वेगाने हा व्हिडिओ आता शेअर केला जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.