(फोटो सौजन्य: X)
एक काळ होता जेव्हा डायनासोर हे पृथ्वीवरील सर्वात क्रूर प्राणी मानले जात होते. डायनासोर आता अस्तित्वात नसले तरी, पृथ्वीवर त्यांच्यासारखे अनेक प्राणी धोकादायक मानले जातात. नुकताच सोशल मीडियावर एका भयानक प्राण्याचे दृश्य व्हायरल झाले आहे ज्यात तो एका माकडाची शिकार करताना दिसून आला. त्याचे विशाल शरीर आणि भयानक रूप कुणालाही क्षणात घाबरवण्यासाठी पुरेसे आहे. जंगलात शिकारीचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतानाच हा व्हिडिओ आता सर्वांना हादरवून सोडत आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
तुम्ही सोशल मीडियावर सिंहाची, वाघाची शिकार आधीही पाहिली असेल पण नुकतीच एका भयानक प्राण्याची शिकार इथे शेअर करण्यात आली. व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता यात दिसते की, एक भयानक चेहऱ्याचा प्राणी एका माकडाला गिळत असल्याचे दिसून येते. त्याने कदाचित आधीच माकडाला मारले असेल, कारण माकड अजिबात हालचाल करत नाही. तो क्षणाचाही विचार न करता काही सेकंदातच त्याला संपूर्ण गिळंकृत करून टाकतो. शिकार कारण्याची त्याची ही स्टाईल आणि भयानक रूप आता सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. शिकारीचे हे व्हिडिओज नेहमीच आपल्याला जंगलातील वास्तवाची ओळख करून देत असतात, यामुळे आपल्याला निसर्गाला जवळून पाहता येते.
Komodo dragons can eat up to 80% of their body weight in one meal and then go weeks without eating. pic.twitter.com/nLQhg5fxBo — Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) October 15, 2025
शिकारीचा हा व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जेवणाचे पण काही मॅनर्स असतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याला ते पचवायला आठवडा जाईल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बिचारा माकड”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.