एक काळ असा होता जेव्हा समाजात तलाक हा शब्द वाईट समजला जायचा. यामुळे महिलांना कितीही छळाचा सामना करावा लागला तरी त्यांनी कधीच लग्न मोडण्याचा विचार केला नाही. त्याकाळी स्त्रीला घटस्फोट मिळाला तर तिला समाजात राहणे कठीण व्हायचे, लोक त्या महिलेवर बहिष्कृत टाकायचे अथवा तिला वाईट वागणूक दिली जायची. पण आता काळ बदलला आहे. बदलत्या काळासोबतच अनेक गोष्टी बदलल्या आहेत. महिला घराबाहेर पडू लागल्या आहेत, आपले मत मांडू लागल्या आहेत.
अशात आपल्याला होणार छळ हा एका मर्यादेपर्यंतच सहन केला जाऊ शकतो हेही महिलांना आता समजू लागले आहे. यामुळेच आता महिला कोणाचीही भीती न बाळगता सर्रास घटस्फोट घेऊ लागल्या आहेत. यामुळे घटस्फोट घेतल्यानंतर त्या दु:खी होत नाही, तर उलटून अशा कितीतरी महिला आहेत ज्या घटस्फोट घेतल्यानंतर आनंदी होतात. अलीकडेच एका पाकिस्तानी महिलेने पार्टी करून घटस्फोटाचा आनंद व्यक्त केला. या पार्टीत तिने जोरदार डान्सही केला. घटस्फोटानंतरचा तिचा हा आनंद पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत. तिच्या या डिवोर्स पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारच्या पार्टीज पहिल्या असतील. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पार्टीज अरेंज करतात. मात्र घटस्फोटाची पार्टी कशी असते तुम्ही कधी पाहिली आहे का? नसेल तर आजच्या या व्हायरल व्हिडिओतून तुम्हाला याची एक अनोखी झलक पाहायला मिळणार आहे. या पार्टीचा व्हायरल व्हिडिओ तुम्हाला थक्क करून सोडेल. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अमेरिकेत राहणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेचा नुकताच घटस्फोट झाला, त्यानंतर तिने मोठी पार्टी केली. पार्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला लेहेंगा घालून बॉलीवूड गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. पार्टीत मागे लिहिले आहे- तलाक मुबारक!
व्हिडिओमध्ये, महिला जांभळ्या रंगाच्या लेहेंग्यात बॉलिवूड गाण्यांवर आनंदाने नाचताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘तलाक मुबारक’ लिहिलेले फुगे उत्सवाच्या वातावरणात भर घालताना दिसत होते. संपूर्ण व्हिडिओत महिलेचा उत्साह आहे एका वेगळ्या उंचीवर पोचल्याचे दिसून येते, जणू इतका आनंद तिला याआधी कधीही झाला नाही. बेधुंद होऊन ती नाचते आणि पार्टीतील इतर लोक तिला चियर करत तिचा उत्साह आणखीन वाढवतात. या व्हिडिओ पाकिस्तानी महिलेचा आहे तिचे नाव मात्र अजून उघड झाले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पाकिस्तानी महिलेच्या डिवोर्स पार्टीचा हा व्हिडिओ @legally_litigate नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘घटस्फोट घेतल्यानंतरची पार्टी’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “परफेक्ट, प्रत्येक स्त्रीने असा उत्सव साजरा केला पाहिजे कारण हा शेवट नसून नवीन अध्यायाची सुरुवात आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी ही करणार, घटस्फोटाची पार्टी नाही तर कायम एकटी सिंगल राहण्याची पार्टी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






