सध्याचे जग फार बदलले आहे. लोक सोशल मीडियाशी इतके जोडले गेले आहेत की, स्वतःला व्हायरल करण्यासाठी ते नको ते करायला पाहतात. अनेकदा आपल्याला व्हायरल करण्याचा नादात लोक असं काही करून बसतात की ते पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो. लोकांना रील बनवण्याचे इतके व्यसन लागले आहे की ते त्यासाठी काहीही करायला तयार असतात. सर्व मर्यादा ओलांडून लोक दररोज आपला जीव धोक्यात घालत आहेत. एक दिवस, व्हायरल होण्याचा हँगओव्हर अशा लोकांना इतका जबरदस्त मारेल की त्यांना आयुष्यभर पश्चात्ताप होईल.
सध्या व्हायरल होण्याचा नादात असाच काहीसा प्रकार एका महिलेने केल्याचे दिसून आले आहे. रील बनवण्यासाठी ती स्वतःचा जीव धोक्यात टाकते आणि असे काहीतरी करते जे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. हा व्हिडिओ पहिल्यांनंतर महिलेवर तुमचाही राग अनावर होईल. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्यावर संताप व्यक्त केला. आता तिने आपल्या रीलमध्ये नक्की असे काय केले ते जाणून घेऊयात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे व्हिडीओत?
व्हिडिओमध्ये एक मुलगी रेल्वे स्टेशनच्या पायऱ्यांवरून अक्षरशः धडाधड खाली पडताना दिसून येत आहे. तिला पडताना पाहून एक काका तिला वाचवण्यासाठी तिला पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याशिवाय आणखी काही लोकही महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतात. पण ते जवळ येताच ती महिला लगेच उभी राहते आणि हसायला सुरु करते. खरंतर ती हे सगळं रील बनवण्यासाठी करत होती. आपली रील व्हायरल करण्याच्या नादात ती आपला जीव धोक्यात टाकते. यावेळी तिची एक चूक तिच्या मृत्यूचे कारण बनू शकले असते. सोशल मीडियावर याआधी असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत मात्र प्रत्येक वेळी हे प्रयत्न यशस्वी होतातच असे नाही. यामुळे तुमचे नुकसान देखील होऊ शकते त्यामुळे असे प्रकार कधीही करू नयेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
तरुणीच्या या प्रकारचा आता सोशल मीडियावर मात्र फार तिरस्कार केला जात आहे. हा व्हायरल व्हिडिओ @hey_arti_01 नावाच्या महिलेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 130 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत तरुणीच्या या अजब प्रकारावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “काकाजींबद्दल आदर, त्यांनी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कृपया मूर्ख गोष्टी करू नका” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हिच्या नादात ते काका खाली पडले असते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






