(फोटो सौजन्य:X)
सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेने नोंद घेतली आहे. याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. वास्तविक, यात एका हत्तीने आपल्या रखवालदाराला चिरडून मारल्याचे दृश्य दिसून आले आहे. यातील दृश्ये इतकी भयानक आणि हृदयद्रावक आहेत की ती पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हत्तीशी पंगा घेणं आपल्याला किती महागात पडू शकतं हे आपल्याला या घटनेतून दिसून येते. यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
नक्की काय घडलं?
सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती हत्तीच्या जवळ उभा आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती हत्तीला काठी दाखवत त्याच्याशी बोलत असल्याचे दिसत आहे, मात्र अचानक पुढे हत्ती अस्वस्थ होतो आजी चिडतो. यानंतर हत्ती रागाच्या भरात आपल्या रखवालदारावरच हल्ला चढवतो. हत्ती आपल्या जड पायाने माणसाला तुडवतो, नंतर त्याला त्याच्या सोंडेत गुंडाळतो आणि त्याला पूर्णपणे चिरडतो. व्हिडिओतील हे दृश्ये फार भयानक आहेत, जी पाहून कुणालाही धडकी भरेल.
हे दृश्य इतकं भीषण आहे की, ते पाहिल्यानंतर लोकांचे हृदय हेलावून गेले. त्या माणसाला वाचवण्यासाठी लोक तिथे पोहोचले तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि तो पूर्णपणे चिरडला गेला होता. लोक आश्चर्य आणि दुःखाने भरले होते, कारण हत्तीची शक्ती आणि राग समजणे कठीण आहे. हा व्हिडिओ लोकांना वन्य प्राण्यांपासून सावध राहण्याची आठवण करून देत आहे. हा व्हिडिओ फक्त दुखावणारा नाही तर मोठा धडा शिकवतो. वन्य प्राण्यांपासून विशेषत: हत्तींपासून सावधगिरी बाळगली पाहिजे.
हा व्हायरल व्हिडिओ @varshaparmar06 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये या धक्कादायक घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खूप दुःखद आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे, म्हणून हत्तीशी जरा लांबच राहावे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.