Farmer Video : कष्टाचं सोनं झालं! पीक येताच शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; लहान मुलासारख्या मारु लागला उड्या, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शेतात रात्रंदिवस काम करुन, घाम गाळून, पिकाची पोटच्या लेकरासारखी काळझी घेतल्यानंतर प्रत्येक शेतकरी पीक कापणीची वाट बघत असतो. हा दिवस शेतकऱ्यासाठी दिवाळी सारखाच असतो. तेलंगनातील शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले असून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की शेतात पीक कापणीचे काम सुरु आहे. दुसऱ्या बाजूला आलेले उत्तमी पीक पाहून शेतकरी आनंदात उड्या मारत आहे. त्याला आपला आनंद सावरता आला नसून तो अगदी लहान मूलासारखा शेताता इकडून तिकडे कोलांट्या उड्या मारत आहे. वयाची, आजूबाजूच्या लोकांची कसलीही पर्वा न करता आनंदात झुमत आहे.
An elderly farmer’s joy knew no bounds after harvesting his paddy crop.
He celebrated like a child in the fields, winning hearts online with his energy and passion for farming.#Farmer #Harvest #ViralVideo #Farming #Inspiring pic.twitter.com/sIdvQTlRXi — Telangana Ahead (@telanganaahead) May 19, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @telanganaahead या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत शेतकऱ्याचा अथांग आनंद अगदी स्पष्टपण दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील भावुक झाले आहेत. एका नेटकऱ्याने, हा केवळ आनंद नाही, तर त्याच्या कष्टाचे, मेहनतीचे फळ आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने हीच शेतकऱ्याची खरी दिवाळी असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






