सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा युजर्सचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. हे व्हिडिओज कधी हास्यास्पद असतात तर कधी अंगावर काटा आणणारे, बऱ्याचदा लोक आपल्याला व्हायरल करण्यासाठी नवनवीन जुगाडू आणि भयानक स्टंट्सचे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातच आता असाच एक धक्कादायक आणि अंगावर शहरे आणणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे, यात रस्त्यावर अचानकपणे एका टँकरचा भीषण स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यावेळी तिथे अनेक गाड्या उपस्थित होत्या ज्या या घटनेत बळी पडल्या.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एका रस्त्यावरचे दृश्य दिसेल. यात रस्त्यावर काही गाड्या एकामागोमग उभ्या आहेत आणि यातच रस्त्याच्या बाजूला एक टँकर उभा आहे. या टँकरला यावेळी आग लागल्याचे दिसून येते. यानंतर पुढे काही समजेल इतक्यात टॅंकरचा जोरदार स्फोट होतो. हा स्फोट इतका मोठा असतो की यात आजुबाजूचे सर्व दृश्य धुसळ होते, स्फोटाच्या आगीत आणि धुरात सर्व गाड्या नाहीश्या झाल्याचे दृश्य दिसू लागते. यावरूनच तुम्ही हा स्फोट किती मोठा असावा याचा अंदाज लावू शकता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा स्फोट इतका मोठा होता की दुरूनच ही घटना आपल्या कॅमेरात कैद करणाऱ्या कॅमेरामॅनलाही तेथून पळ काढावी लागते. फार दूरपर्यंत याच्या ज्वलंत झळा पसरलेल्या असतात. दूर उभे राहिलेले लोकही यातून आपला जीव वाचवण्यासाठी पळताना व्हिडिओत दिसून येतात. टँकर स्फोटाचा हा थरार पाहून आता अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. व्हिडिओतील दृश्ये फार थरारक असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा व्हायरल व्हिडिओ @akshaykadam1806 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘अशा परिस्थितीत गाफिल न राहता जास्तीत जास्त लांब राहणे कधीही चांगलेच…’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी तिथंच होतो है झालं तेव्हा 11 लोक मृत्यू पावली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पहिल्यांदा कॅमेरामन ची फाटली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे पाहून वाईट वाटते की लोक याची खिल्ली उडवत आहेत… तिथे ज्याने कोणी जवळचा आपला हरवला असेल, देव त्यांच्या फॅमिली ला बळ देवो, ओम शांती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.