(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन; जाब विचारताच नराधमाने उचलला हात, Video Viral
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, कडाक्याच्या उन्हात एक वरात जाताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या वरातीसोबत एक चालता-फिरता मंडप आहे. वऱ्हाड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी हा जुगाड करण्यात आला आहे. वरातीबरोबर काही लोक हा मंडप घेऊन चालताना दिसत आहेत. यामुळे वऱ्हाडी आरामात गाण्यांच्या तालावर नाचताना दिसत आहेत. हा जुगाड पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @deej_rohit_435 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे, हा जुगाड भारताबाहेर नाही गेला पाहिजे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हा तर खरा व्हिआयपी थाट आहे असे म्हटले आहे. आणखी एकाने आतापर्यंतच सगळ्यात भन्नाट लग्न आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






