संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये महिलेशी गैरवर्तन; जाब विचारताच नराधमाने उचलला हात, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पीडीतेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने व्हिडिओ सांगते की, ट्रेनमध्ये एक तरुणी दीड तास तिच्याकडे एक-टक बघत होता. तिला नको-नको ते अश्लील इशारे करत होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की संबंधित तरुण तरुणीकडे बघून Flyig kiss करत आहे तेही अश्लीलपणे. यावर महिलेने त्याला जाब विचारताच असे काही केलं आहे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. तरुणाने थेट तरुणीच्या कानाखाली लगावली आहे. या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ट्रेनमधील कोणतीही व्यक्ती महिलेच्या मदतीला आलेले नाही.
रेल में महिलाओं से बदसलूकी और मारपीट का ये वीडियो सोशलमीडिया पर वायरल है।
जब तक ये आरोपी पकड़ा ना जाये जिम्मेदारी अधिकारीयों को टैग कीजिए।@RailMinIndia इस दरिंदे को कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए।
@AshwiniVaishnaw#ElectionResult2026 pic.twitter.com/4prR4ELrXm — अश्विनी सोनी (@Ramraajya) May 4, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @Ramraajya एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच प्रवाशांनी मदत न केल्यानेही वाद पेटला आहे. अशा लोकांमुळेच महिला आज सुरक्षित नाही असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






