(फोटो सौजन्य: Instagram)
हिंदू धर्मात, लग्नाला फार महत्त्व आहे. लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे मिलन मानले जाते. लग्नाच्या विधींना धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे, या विधी एकदा का सुरु झाल्या की मग त्या अर्ध्यात सोडता येत नाहीत. अशात सध्या देशात भारत-पाकिस्तान युद्धाचे वातावरण फार चर्चेत आहे, ज्यामुळे देशाच्या काही भागांमध्ये ब्लॅकआउट केले जात आहे. जेणेकरून पाकिस्तानच्या कोणत्याही कटापासून नागरिकांना वाचवता येईल. या ब्लॅकआउट वेळीच राजस्थानमधील जोधपूरमध्ये एक लग्नसोहळा पार पडत होता ज्यामध्ये वर-वधूचे फेरे सुरु होणार होते मात्र याच वेळी अचानक ब्लॅकआउट करण्यात आला.
आता सर्वत्र अंधार झाल्यांनतर आपण सर्वच गोष्टी थांबवतो मात्र यावेळी असे घडले नाही तर वर-वधूने ब्लॅकआउटमध्येही आपले फेरे जारी ठेवले आणि फोनची फ्लॅश लाईट लावून हे फेरे पूर्ण करण्यात आले. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून जगात काहीही हो लग्न थांबायला नको अशा प्रतिक्रिया आता लोक या व्हायरल व्हिडिओला देत आहेत. वधू-वरांसाठी मात्र हा एक खास क्षण ठरला असता, जो ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. व्हायरल क्लिपमध्ये, वधू आणि वर ७ फेरे घेत असल्याचे दिसून येते आणि पंडितजी फ्लॅशच्या प्रकाशात मंत्र म्हणताना दिसून आले.
राजस्थान के जोधपुर में ब्लैक आउट के बीच एक शादी हुई, मोबाइल टॉर्च की रोशनी में कपल ने 7 फेरे लिए !! pic.twitter.com/fAIVFUnKww
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) May 11, 2025
अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकत आहेत. लोकांनी व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला असून लोक या व्हिडिओला आता वेगाने शेअर करू लागले आहेत. हा व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून याला १० हजारांहून अधिकच्या व्युज मिळाल्या आहेत. इतकेच काय तर लोकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये या अनोख्या लग्नावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काय काय पाहावं लागत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हल्ला झाला तरी लग्न थांबवू नये कारण मुलगी मोठ्या कष्टाने सापडली आहे “.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.