फोटो - सोशल मीडिया
मध्यप्रदेश : उत्तर भारतामध्ये श्रावण या पवित्र महिन्याला सुरुवात देखील झाली आहे. श्रावणामध्ये भगवान शंकराची उपासना केली जाते. या दरम्यान ज्योर्तिंलिंगाचे दर्शन घेणे देखील पावन मानले जाते. मात्र यामुळे मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळली आहे. श्रावण महिन्यामध्ये ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे तर दूरच अगदी हात जोडणे देखील अवघड झाले आहे. भाविकांची मोठी गर्दी झाल्यामुळे पुजारी भक्तांना पुढे पुढे सरकवत आहेत. गर्दीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. या सर्वच ठिकाणी भक्तांचा समुदाय दर्शनासाठी आलेला आहे. श्रावणातील प्रत्येक दिवशी या मंदिरामध्ये मोठी गर्दी होत आहे. खास करुन सोमवारी दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे दर्शन रांगा वाढल्या आहेत. दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा रांगा लागल्या आहेत. गरमीमध्ये या रांगामध्ये भाविक भक्तीभावाने रांगा करत आहेत. मात्र दर्शन घेणे देखील अवघड झाले आहे. सोशल मीडियावर एका भाविकाने आपला अनुभव शेअर केला आहे.
पांच छह घंटे तक बारिश गर्मी सह कर लाइन में रहने के बाद जब आप प्रभु के दर्शन को जाओ तो वहां खड़े गार्ड आपको जानवरों की तरह धक्के मार के निकाल देते हैं। बाबाधाम देवघर और त्र्यम्बकेश्वर दोनों जगह मेरे साथ भी ऐसा हुआ। बहुत गलत है pic.twitter.com/LilYwl7FbC
— Mihir Jha (@MihirkJha) July 22, 2024
मीहिर झा या नेटकऱ्यांने शेअर केलेला व्हिडिओ झारखंड येथील बैद्यनाथ धाम देवघर येथील आहे. अनेक ज्योतिर्लिंगांमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन शिवलिंगाला स्पर्श करण्याचे दर्शन बंद केले आहे. भाविकांना लांबूनच दर्शन घ्यावे लागत आहे. मात्र ते घेणे देखील आता शक्य होत नसल्याचे दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगांमध्ये एक असलेल्या बैद्यनाथ धाम देवघर येथे देखील एका घसरड्या पुलावरुन शिवलिंगावर पाणी वाहिले जाते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भाविक दर्शनासाठी पुढे येत आहे. मात्र एक सेकंद देखील त्यांना तिथे थांबून दिले जात नाही. मंदिराचे पुजारी प्रत्येकाला पुढे ढकलून देत आहे. पाणी वाहणे देखील मुश्कील झालेले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून काहींनी पुजाऱ्यांचे वागणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.