अरे देवा आता रावण विकतोय भाजी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात, त्यापैकी काही असे असतात की ते पाहिल्यानंतर हसून हसून पोट आणि गाल दुखायला लागतात. सध्या काहीही व्हायरल होत असतं आणि अनेकजण तर व्हायरल होण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरत असतात. तर काही जण आपल्या मालाची विक्री व्हावी यासाठी क्लृप्ती लढवत असतात. असाच एका भाजी विक्रेत्याचा असाच एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लंकापती रावणाच्या शैलीत भाजीपाला विकत आहे.
हो तुम्ही योग्यच वाचलं आहे. भाजीविक्रेता रावणाच्या आवाजामध्ये भाजी विकत आहे. पहिल्यांदा तर नक्कीच घाबरायला होईल पण हा व्हिडिओ पहाल तर हसूनहसून तुमचं पोट नक्कीच दुखेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय आहे नक्की या व्हिडिओमध्ये तर पहा हा व्हिडिओ
मजेशीर व्हिडिओ
व्हिडिओ पाहून तुम्हाला रामलीलेच्या रावणाची आठवण येईल
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक भाजीपाला विक्रेता त्याच्या गाडीने उभा असलेला दिसतो आणि ग्राहकांना रामलीलेच्या रावणाच्या शैलीत भाजीपाला खरेदी करण्यास सांगत आहे. सर्वप्रथम तो रावणाच्या शैलीत हसतो. त्याच्या हातात माइक आणि स्पीकर आहे. व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होते की भाजीपाला विक्रेत्याच्या या शैलीमुळे बरेच ग्राहक आले असतील.
हा व्हिडिओ ‘राकेश निषाद’ नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा रामलीलेची भूमिका साकारणारी व्यक्ती गावात भाजीपाला विकायला येते’. तुम्हाला सांगतो की, त्या व्यक्तीने भाजीपाला विक्रेता बनून अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर केले आहेत, जे लोकांना खूप आवडले आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोकांना तो खूप आवडला आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, “जर असा भाजी विक्रेता आमच्या घरी आला तर संपूर्ण परिसर भीतीने घरात बसेल”, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, “सीतेच्या अपहरणानंतर रावण भाजी विकतोय”, तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, “हे इतके धोकादायक आहे की मी घाबरलो.” एक जणाने म्हटले की, ‘काहीही असो यार आवाजात दम आहे’ तर एक जण म्हणाला, ”किती भयानक हास्य रे बाबा, मी तर घाबरलो, तर एकाने कौतुक करत म्हटले की, ‘व्यापार करायचा असेल तर लाज बाळगून चालत नाही…खूपच मस्त भावा’ हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच दरदरून घाम फुटेल पण तितकेच तुम्ही हसाल हेदेखील नक्की!