मुंबईनगरीला आली जपानसारखी बहर! Cherry Blossom चा फील घेण्यासाठी हौशींची गर्दी, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, जपानमधील टोकियोसारखा चेरी ब्लॅसमचा फेस्टिव्हल मुंबईमध्ये भासत आहे. या गुलाबी झाडांनी मुंबईकरांना प्रेमात पाडले आहे. सहसा चेरी ब्लॉसमचा आनंद घेण्यासाठी लोक सातासमुद्रापार जातात. परंतु आता याची गरज उरलेली नाही. लोक याचा फील घेण्यासाठी मुंबईच्या विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान च्या एक्सप्रेसवर जात आहे. या पिंक ट्रम्पेट झाडांनी मुंबईकरांना भुरळ घातली आहे. या झाडांनी लोकांचे लक्ष वेधले आहे. खरे तर मुंबईचे उष्ण हवामान या झाडांसाठी अनुकूल नाही. परंतु ही बहर आल्याने मुंबई गुलाबी रंगात बुडाली आहे. या झाडांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते. यामुळे महामार्गच्या दुभाजकांवर ही झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे हे एक पर्यटनाचे केंद्र बनले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @harshalnikale या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. हा गुलाबी रंगाचा फुलोरा पाहून लोक प्रेमात पडले आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, ईस्ट आणि वेस्टर्न विक्रोळी एकदम बेस्ट आहेत, तर दुसऱ्या एकाने विक्रोळीची सुंदरता अशी कमेंट केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






