मुक्या जीवाशी क्रूर वागणूक! पाळीव उंटाला मालकाची बेदम मारहाण; व्हिडिओ पाहून तळपायाची आग जाईल मस्तकात, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. यामध्ये चित्र-विचित्र, भयावह, मजेशीर, अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावेस वाटतात, तर काही व्हिडिओ पाहून किळसवाणं वाटते, तर व्हिडिओ पाहून संताप येतो. प्राण्यांसंबंधीचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती मुक्या जीवाला क्रूर वागणूक देत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संतापाचे कारण बनल आहे.
पण हा व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या उंटाला क्रूरपण मारहाण करत आहे. काठीने त्याला बदडत आहे. उंट असहाय्यपणे ओरडत आहे, मात्र मालकाला त्याची जराही दया येत नाही. तो उंटावर काठीने प्रहार करत आहे. उंट घाबरुन जमिनीवर पडला आहे. पण तरीही मालकाने मारहाण करणे काही थांबवलेले नाही. सध्या हा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
लाड प्यार मे डाँट-डपट चलती रहती हैं, लेकिन कोई ऐसे 🐫 थोड़ी मारता है …!!#गोगामेडी_मेला #Gogamedi #Hanumangarh pic.twitter.com/VSVHUnEneg
— Vinod Bhojak (@VinoBhojak) August 31, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @VinoBhojak या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे. पशुसंवर्धन संघटनांनी देखील याविरोधत तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडिओ राजस्थानच्या हनुमानगड येथील असल्याचे सांगितले जात आहे. एका नेटकऱ्याने हा माणूस तर प्राण्यांपेक्षाही क्रूर आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने या व्यक्तीला देखील असेच बदडले पाहिजे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याकडून घटनेची माहिती मागीतली आहे, ज्यामुळे संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई करता येईल.
अजूनही माणूसकी जिवंत आहे! पुरात अडकलेल्या वासरासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.