काय म्हणावं याला! आधी बेसनमध्ये घोळली मग तेलात टाकून तळली; सिगारेटचा भलताच प्रयोग, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सिगारेटच्या पॅकेटवर मृत्यूचा संदेश दिलेला असतानाही लोक ती ओढतात. या पठ्ठ्याने थेट सिगारेटची भजी केली आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक तरुण बेसन घोळत आहे. यामध्ये तो सिगारेटच्या पॅकेटमधून तीन सिगारेट टाकतो. यानंतर त्याला बेसनने कोटिंग करुन तो उखळत्या तेलाच्या कढईत टाकतो. तुम्ही पाहू शकता की, तरुणाने सिगारेट तळून काढल्या आहेत. सध्या या व्हिडिओमुळे खाद्याप्रेमी नाराज झाले आहेत. हा मृत्यूचा खेळ असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेकांना याला अन्नाच अपमानही म्हटले आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! Scuba Diving करताना ट्रेनरनेच काढली महिलेची छेड; संतापजनक Video आला समोर
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @aslamhossain2033 अस्लमने या हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावरर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तर यावरुन खाद्य प्रेमींमध्ये संताप पेटला आहे. एका नेटकऱ्याने हे खावं की प्यावं हे मी ठरवू शकत नाहीये असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आपल्या मित्राला टॅग करत तुमच्यासाठी इफ्तार बनवली जात आहे असे म्हटले आहे. तर अनेक खाद्यप्रेंमी काय भलताच प्रयोग केलाय, अन्नाचा अपमान होतोय, भज्यांवर अत्याचार होतोय अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी देखील अशा विचित्र प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






