(फोटो सौजन्य:Instagram)
सोशल मीडियावर अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी कोणत्या धक्कादायक घटना शेअर केल्या जातात तर कधी हास्यास्पद तर कधी अपघातांचे दृश्यही इथे शेअर केले जातात. आताही इथे रेल्वे संबंधीचा एक थरारक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, यात एक मुलगा रेल्वे रुळांमध्ये अडकल्याचे दिसते. रेल्वे रुळांवर अडकल्याची ही पहिलीच घटना असावी. व्हिडिओतील तरुणाची घालमेल पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. यात पुढे नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
अलीकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे, जो ट्रेनशी संबंधित आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ट्रेनच्या रुळांमध्ये वाईटरित्या अडकलेला दिसत आहे.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती ज्या ठिकाणी अडकली आहे तो पूल आहे आणि त्याच पुलावर ट्रॅक आहेत. व्यक्तीची ही अवस्था अनेकांच्या अंगाला शहारे देण्यासारखी आहे. तथापि, व्हिडिओतील ही दृश्ये खरी आहेत की नाही यावर अनेक युजर्सने शंका व्यक्त केली आहे. व्हिडिओच्या शेवटी हे स्पष्ट होते की त्या व्यक्तीने जाणूनबुजून स्वतःला त्या परिस्थितीत टाकले आहे. व्हिडिओमध्ये, व्यक्ती त्या अंतरात अडकून अडचणीत अडकल्यासारखे भासवण्याचा प्रयत्न करते. खरं तर, तो स्वतःचा रील व्हिडिओ बनवण्यासाठी हे सर्व करत होता. अनेकांना व्यक्तीची ही युक्ती समजली आणि लोकांनी कमेंट्समध्ये मुलावर आलोचना देखील केली.
दरम्यान तरुणाचा हा व्हिडिओ @train_yatra144 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रेल्वे ट्रॅकवर अडकला व्यक्ती’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ठीक आहे कट!! खूप चांगला अभिनय केला आता बाहेर ये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तू इथे गेला कसा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.