(फोटो सौजन्य: instagram)
आजकाल सोशल मीडियावर लाइक्स आणि व्ह्यूजसाठी लोक अनेक विचित्र गोष्टी करू लागले आहेत. यासाठी लोक आता आपला जीव देखील धोक्यात टाकू लागले आहेत. अशा अनेक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यात लोक आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक नको ते पराक्रम करू पाहतात आणि मग आपल्या जीवाला धोक्यात टाकतात. आताही अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका तरुणाने कॅमेऱ्यासमोर असा स्टंट करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा स्टंट काही साधासुधा नसून यात त्याचा चेहरा जळताना दिसून आला. व्हिडिओतील हे थरारक दृश्ये पाहून अनेकजण आवाक् झाले आणि तरुणावर टीका करू लागले. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
अनेकलोक विचार न करता फक्त व्हायरल व्हायचं म्हणून नको ते करू पाहतात पण यात त्यांचेच नुकसान होते. सध्या तरुणांमध्ये स्टंटबाजीची हवा फार पसरू लागली आहे. याद्वारे लोक अनेक विचित्र प्रकार करून लोकांना थक्क कारण्याचा प्रयत्न करतात मात्र कधीकधी हे प्रकार त्यांच्यावरही उलटे पडतात. नुकताच व्हायरल होत असलेली या व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले. तरुण स्टंट करण्यासाठी एक लायटर हातात घेतो आणि दुसरा लायटर त्याच्या तोंडात पकडतो. यानंतर त्याच्या एका चुकीमुळे हा लायटर त्याच्या तोंडातच फुटतो आणि त्याचे संपूर्ण तोंड आगीने जळू लागते. हा सर्व प्रकार आता अनेकांच्या अंगावर काटा आणत आहे.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात एक तरुण आपला कॅमेरा नीट सेट करत स्टंटची तयारी करताना दिसून येतो. यानंतर पुढच्याच क्षणी तो एक लायटर आपल्या तोंडात ठेवतो आणि दुसरा लायटर आपल्या हातात धरतो. यानंतर हातातील लायटर पेटवत तो तोंडात असलेला लायटर तोडण्याचा प्रयत्न करतो मात्र तितक्यात हातातील लायटरची ती आग त्याच्या तोंडावर येते आणि त्याचे संपूर्ण तोंड आगीने पेटून उठते. मात्र सुदौवाने काही क्षणातच ही आग विझते ज्यामुळे यात तरुणाला गंभीर दुखापत होत नाही.
जे लोक विचार न करता स्टंट करतात हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एक धडा आहे. चित्रपट आणि रिॲलिटी शोमध्ये दाखवले जाणारे स्टंट एक्सपर्टसच्या देखरेखीखाली केले जातात, जिथे संपूर्ण सुरक्षा राखली जाते. मात्र सर्वसामान्यांनी हे करणे टाळावे, कारण एक छोटीशी चूक मोठी दुर्घटना घडू शकते. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणे शहाणपणाचे नाही. यामुळे तुमचा जीव धोक्यात पडू शकतो, तुमची एक चूक तुमचा जीव घेऊ शकते.
रिंग सेरेमनीच्या वेळी अचानक वराची फाटली पँट, वधूलाही हसू आवरेना; हास्याने लोटपोट करणारा Video Viral
तरुणाच्या स्टंटबाजीचा हा व्हिडिओ @dirwannnnnnnnn नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे तर बऱ्याच जणांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “घोस्ट रायडर ट्यूटोरियल देत आहे वाटतं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “याला म्हणतात मृत्यूच्या मुखातून बाहेर येणे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.