(फोटो सौजन्य: instagram)
जंगलातील अनेक थरारक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. जंगलतील आयुष्य हे बरेच वेगळे असते ज्यामुळे इथल्या घटना नेहमीच लोकांना आकर्षित करत असतात. आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी प्राणी शिकारीचा मार्ग निवडत असतात. या शिकारीचे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर शेअर होतात तेव्हा लोक त्यातील दृश्ये पाहून हादरून जातात. सध्या देखील अशाच एक शिकारीचा व्हिडिओ इथे शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे.
जंगलातील धोकादायक प्राण्यांमध्ये काही प्राण्यांचा मुख्यत्वे समावेश होतो. तसेच जंगलातील चपळ प्राणी म्हटलं की, डोळ्यासमोर फक्त एकाच प्राणी दिसू लागतो तो म्हणजे कोल्हा. आपल्या चपळतेने तो प्राण्यांची शिकार करतो. सध्या सोशल मीडियावर कोल्ह्याच्या शिकारीचाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे मात्र यात कोल्ह्याची हार झाल्याचे दिसून आले आहे. जगात कोणीही कितीही बलाढ्य असला तरी असे म्हणतात की एका आईसमोर त्याचे काहीही चालू शकत नाही. आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ शकते. कोल्ह्यासोबतही असेच काहीसे घडले आहे. नक्की काय घडले ते आपण सविस्तर जाणून घेऊया.
रिंग सेरेमनीच्या वेळी अचानक वराची फाटली पँट, वधूलाही हसू आवरेना; हास्याने लोटपोट करणारा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये एक कोल्हा चपळतेने एका श्वानाच्या पिल्लावर हल्ला करताना दिसून येत आहे. यात घडते असे की, एक कोल्हा एका बिळाजवळ येतो यात श्वानाचे पिल्लू असल्याचे त्याला आधीच ठाऊक असते. मिळालेल्या संधीचा फायदा घेत कोल्हा त्या बिळाजवळ जातो आणि आपला हात त्यात टाकून अक्षरशः पिल्लाला खेचत बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. यात तो यशस्वीही होतो मात्र पिल्लाला आपली शिकार बनवणार तितक्यात मागून त्याच्या आईची एंट्री होते. कोल्हा आपल्या पिल्लाची शिकार करत असल्याचे पाहून ती भडकते आणि अजिबात वेळ न घालवता कोल्ह्यावर हल्ला चढवते. कोल्हाही यावेळी तिचा रुद्रावतार पाहून घाबरतो आणि तेथून पळून जातो. अशाप्रकारे एक आई आपल्या मुलाचे प्राण वाचवते आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.
हा व्हायरल व्हिडिओ @wildanimalshortsnature नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आई आपल्या पिल्लाला कोल्याच्या हल्ल्यापासून वाचवते’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “स्वतःवर हल्ला झाल्यावरही असेच व्हिडिओ बनवा आणि लाइक्स मिळवा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ” काय मजा घेताय, मी असतो तर नक्कीच त्याचा जीव वाचवला असता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.