(फोटो सौजन्य: Instagram)
जलपरीचे वास्तव सत्यात आहे की नाही हे अजूनही मानवासाठी एक गूढ बनून राहिलं आहे. अनेक ठिकाणी ती दिसण्याचा दावा करण्यात आला आहे पण सत्य कुणाच्याही हाती लागले नाही. आता जलपरी म्हणजे काय असा प्रश्न कर तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा एक मासा आणि मानव यांच्या समिश्रणातून तयार झालेला एक अनोखा जीव आहे. जलपरीचे शरीर हे मानवाप्रमाणं असतं पण कमरेखालून तिच्या शरीराचा अर्धा भाग माशासारखा असतो. म्हणजेच तिला मानवाप्रमाणे चेहरा, हात असतात पण पयांऐवजी तिला माशासारखी शेपटी असते. तिचे हेच अनोखे रूप तिला खास बनवते आणि म्हणूनच तिचे दिसणे फार दुर्लभ मानले जाते.
व्हिडिओत दिसली जलपरी
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक जलपरी दिसून आली आहे. व्हिडिओमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर एक जलपरी बसल्याचे दिसून येते, यात तिचे वरचे शरीर माणसासारखे दिसते आणि खालचा भाग माशासारखा दिसत आहे. यावेळी ती जरा दुःखी असल्याचे वाटते आपल्या डोक्यावर हात ठेवत ती तिथे बसलेली असते आणि तितक्यात आपल्याला कोणी तरी पाहत आहे याचा अंदाज तिला लागतो. कॅमेरा पाहताच ती घाबरते आणि उलट्या पावली तिकडून पाण्यात पळू लागते आणि इथेच ट्विस्ट घडतो कारण याचवेळी आपल्याला समजते की मागे आणखीन एक जलपरी पाण्यात पोहत असते जी दुरूनच हे सर्व पाहत असते. व्हिडिओतील हे दृश्य आता खरं आहे की खोटं याची पुष्टी अद्याप झालेली नाही पण जलपरीचा हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जात आहे. काहींनी यातील दृश्य खरे मानले आहे तर काही याला AI मनात आहेत.
दरम्यान जलपरीचा हा व्हिडिओ @beyondtheradar नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लोक कॅमेरा स्थिर का धरत नाहीत? हे खूप त्रासदायक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्हाला हा व्हिडिओ कुठे सापडला, हा व्हिडिओ अर्धा कट करून मग जोडला आहे का” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा नक्की खरा व्हिडिओ आहे का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.