स्पेस डान्स कधी बघितला का? मग सुनिता विल्यम्स अन् डॉन पेटिट यांचा 'हा' रोमॅंन्टिक VIDEO एकदा बघाच (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स 19 मार्च रोजी 9 महिन्यांच्या मोहीमेनंतर सुखरुप पृथ्वीवर परतल्या आहेत. अंतराळातील खडतर प्रवास, एकाकी जीवन, तांत्रिक अडचणी या सगळ्यावर मात करत त्या आनंदाने पृथ्वीवर परतल्या आहेत. पण तुम्हाला माहित आहे का अंतराळात बराच काळ राहिल्यामुळे अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे अंतराळवीरांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यवर परिणाम होण्याची शक्यता असते.
अतंराळात मनोरंजनाचे मार्ग अंतराळवीरांना स्वत:च शोधावे लागतात. अशा परिस्थिती मनोबल कमी असलेल्या व्यक्तींसाठी खूप मोठे आणि कठीण आव्हान असते. यामुळे अंतराळात वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडतो. याच दरम्यान सुनिता विल्यम्स आणि डॉन पेटिट यांनी एक अनोखा आणि आनंदी क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकात शून्य गुरुत्वाकर्षणात डान्स करताना दिसत आहे. सध्या या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुनिता विल्यम्स आणि डॉन पेटीट अंतराळ स्थानकाच्या मॉडेल्स मधून तरंगताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांचा हात पकडून आनंदाने इकडे तिकडे फिरत, डान्स करताना दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता की, दोघेही रोमॅंन्टिक डान्स करत अंतराळ स्थानकात प्रवेश करत आहेत. अगदी सहजपणे दोघेही डान्स करत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस पडत आहे. डॉन पेटीट हे नासाचे अनुभवी अंतराळवीर आहेत. हा डान्स अंतराळात अंतराळवीरांना आपले मनोबल जपण्यासाठी एक अत्यंत सुंदर क्षण आहे. यामुळे अंतराळवीरांना त्यांचे मानसिक आरोग्य जपण्यास मदत होते. यापूर्वीही जपानी अंतराळवीर कोइचटी वाकाटा यांचा अंतराळात क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Two-step dancing in space.
— A. Pettit (@PettitFrontier) May 1, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ डॉन पेटीट यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @PettitFrontier या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. एका युजरने खूप छान डान्स केले, मला खूप आवडला असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने, दोघे किती सहजपणे डान्स करत आहेत असे म्हटले आहे. आणखी एका युजरने, उत्सुकता लागली आहे की, ते कोणता डान्स करत असतील असे म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘टू स्टेप्स डान्सिंग इन स्पेस’ असे लिहिले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.