एक चूक अन्...! ओव्हरटेकच्या प्रयत्नात कारची स्कूटीला जोरदार धडक; अन् तरुण थेट हवेत...,VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. नुकतेच दोन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत होते. आता आणखी एक भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूर महामार्गावर ही घटना घडली आहे. एका स्कूटीस्वाराची आणि कारची जबरदस्त धडक बसली आहे. कार चालकाच्या चूकीमुळे हा अपघाता झाला असल्याचे म्हटले जात आहे.
कार चालक दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक कारयाला गेला, पण समोर असलेला ब्लाइंड स्पॉट त्याला दिसला नाही. त्याने थेट क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. पण याच वेळी दुसऱ्या बाजूने दोन तरुण स्कूटीवरुन येत होते. यामुळे कारची आणि स्कूटीची जोरदा धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की स्कूटीस्वार थेट हवेत उडाला आणि खाली आदळला. यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. यानंतर आसपासच्या लोकांना तातडीने धाव घेतली आणि तरुणाला रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितनुसार, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. कार चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशच्या अनंतपूर महामार्गावर सतत अपघात होत असतात. अनेक गाड्या जास्त सामान भरतात तसेच त्यांचा वेगही जास्त असतो. यामुळे अनेकदा ब्लाइंड स्पॉट दिसून न आल्याने भीषण अपघातात होतात. पण या अपघातंवरुन लोकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करणे किती महत्वाचे आहे हे समजून घेतले पाहिजे.
Anantapur, Andhra Pradesh 🚨
Always check blind spots before overtaking or crossing one small mistake can be costly! pic.twitter.com/8HzYfxpsOA— Deadly Kalesh (@Deadlykalesh) August 17, 2025
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Deadlykalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच लोकांनी कार चालकारवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच स्कूटी चालवणाऱ्याचाही वेग जास्त होता असे लोकांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काळजात धडकी भरवणारा क्षण! अचानक भल्या मोठ्या ट्रकखाली आली तरुणी…; पुढे जे घडंल भयानक, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.