आजकाल सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडीओज हास्यास्पद असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एका आजोबांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यातील आजोबांचे कृत्य पाहून तुम्ही आवाक् व्हाल. हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात पाहिला आणि शेअर केला जात आहे.
अनेक चित्रपटांमध्ये आपण काही जीवघेण्या स्टंटबाजी पाहत असतो. मात्र चित्रपटांमध्ये या गोष्टी फार काळजी घेऊन केली जाते. आता याच चित्रपटनमधील स्टंटबाजी बघून अनेक तरुण सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अशा स्टंट्सचा खऱ्या आयुष्यात वापर करताना दिसत असतात. मात्र असे करणे फार जीवघेणे आणि धोक्याचे ठरते. हे स्टंट पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. या स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीवदेखील जातो.
हेदेखील वाचा – मरणाच्या दारी पोहचवणाऱ्या सुसाइड मशीनने झाला पहिला मृत्यू, जंगलात दिसले भयानक दृश्य
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असेच काहीसे झाल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनच्या दरवाजावर एक आजोबा स्टंट करताना दिसत आहेत. चालत्या ट्रेनमध्ये दारावरील पायरांवर उतरून हे आजोबा स्टंट करत आहेत. तर कधी दरवाजावर चढून जीवावर बेतणारी स्टंटबाजी त्यांची सुरु आहे. स्टंट जरी ते करत असले तरी आता त्यांना पाहून अनेकजण आता थक्क होत आहेत. अचानक ते पडतील आणि त्यांच्या जीवाचे काही बरेवाईट होईल अशी भीती व्हिडिओ पाहताना युजर्सच्या मनात येत आहे.
हेदेखील वाचा – एक चूक अन् होत्याच नव्हतं होऊन बसलं! रस्त्यावरून पळताना चिमुकलीला भरधाव ट्रकने चिरडले, मृत्यूचा थरारक Video Viral
आजोबांच्या जीवघेण्या स्टंटचा हा व्हिडिओ @mumbai.hai.bhai नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ” आता ही अवस्था आहे तर तारुण्यात यांनी किती गदारोळ घातला असेल” असे मिश्किल वाक्य लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला 3 दहलाक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेक युजर्सने कमेंट्स करत या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “यमराजांसोबत काकांचे उठणे बसने आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “चाचा अगदी जोशमध्ये आहेत.”