चहा हा अनेकांच्या आवडीचे पेय आहे. बऱ्याच जणांची दिवसाची सुरुवात या चहाने होत असते. देशातच काय तर जगभरात चहाप्रेमी पाहायला मिळतात. यामुळेच आजकाल रस्त्या रस्त्यावर चहाचे स्टोल्स बघायला मिळतात. या स्टोल्सवर कधीही बघा चहा पिण्याऱ्यांची भलीमोठी गर्दी पाहायला मिळते. सकाळ संध्याकाळ अहो दुपारी सुद्धा लोक चहा पिणे सोडत नाही. अशात हे चहाचे स्टाॅल्स संपूर्ण दिवसभर सुरू असतात. आता रस्त्यावर चहाचे वेगवेगळे स्टाॅल्स तर तुम्ही बऱ्याचदा बघितले असतील मात्र हा चहा विकणारा हा चायवाला दिवसाला किती कमाई करत असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
सध्या सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताच मोठ्या वेगाने व्हायरल झाला आहे. यात चायवाला एका दिवसाला किती कमाई करतो ते दाखवण्यात आली आहे. दिवसाच्या कमाईची ही आकडेवारी पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत. ही कमाई एका उच्च पदावर नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यालाही लाजवेल.
हेदेखील वाचा – भररस्त्यात तरुणीने काढले कपडे, लोकं पाहतच राहिले, Video Viral
एका सोशल मीडिया इल्फ्लुएंझरने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात एका चायवाल्याची दिवसाची कमाई जाणून घेण्यासाठी संपूर्ण दिवस त्याच्या चहाच्या स्टाॅलवर त्याच्यासोबत काम करतो. यात त्याच्या चहाच्या स्टाॅलवर सकाळपासून ते रात्रीपर्यंत लोकांची गर्दी पाहायला मिळते. मुख्य म्हणजे, रात्री जेव्हा तो संपूर्ण दिवसाच्या कमाईचा हिशोब लावतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो.
एका काप चहा मुंबईमध्ये साधारण 10 रुपयांना विकला जातो आणि चायवाला संपूर्ण दिवसांत 317 काप चहा विकतो. म्हणजेच तो दिवसाला 3 हजार 152 रुपये कमावत आहे. बरं दिवसाला 3 हजार म्हणजे महिन्याला तो जवळपास 1 लाख 10 हजार आणि वर्षाला 12 ते 14लाख रुपयांची कमाई करतो. एका उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तीलाही इतका पगार दिला जात नाही जितके पैसे हा व्यक्ती फक्त चहा विकून कमावतो. ही आकडेवारी पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.
हेदेखील वाचा – कोबरा Vs कोबरा: दोन कोब्रांमधील थरारक लढतीचा Video Viral, शेवट तुम्हाला थक्क करेल
व्हायरल व्हिडिओ @sarthaksach नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 9 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपले मतदेखील मांडले आहे. एका युजरने लिहिले, “मी पण आता चहा विकणार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खर्च आणि मेहनत फ्रीमध्ये येते का? आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यात खर्च कोण जोडणार?”