(फोटो सौजन्य – Instagram)
नुकताच उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत सर्वत्र उष्णतेची लाट पसरते, ज्याने सर्वच हैराण आहेत. माणूस असो वा प्राणी, सर्वांनाच उन्हाळ्याचा सर्वांनाच त्रास होत असतो. उन्हापासून वाचण्यासाठी लोक पंखा, कूलर, एसी वापरतात. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे मार्ग निवडतात, जुगाड करतात. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, मात्र हा व्हिडिओ कोणत्या व्यक्तीचा नसून एका गोंडस पिल्लाचा आहे. यात तुम्हाला एक कुत्र्याच पिल्लू गर्मीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी फ्रिजमध्ये जाऊन बसल्याचे दिसून येईल. यानंतर मालकीण त्याला पकडते आणि मग पुढे जे होते ते आणखीनच मजेदार वळण घेते. व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये कुत्र्याचं पिल्लू फ्रिजमधील भाजीपाल्याच्या डब्यात बसलेले दिसून येते. एक महिला त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो बाहेर येण्यास तयार होत नाही. व्हिडिओमध्ये ती महिला बोटांनी हातवारे करून पिल्लाला बाहेर येण्यास सांगताना दिसत आहे. पण ते पिल्लू लहान मुलासारखे रागावत आपली मान दुसरीकडे करतो. तो त्याला चावण्याचा प्रयत्नही करतो, वारंवार भुंकतो. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला सात लाखांहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. पिल्लाचे निरागस रूप पाहून युजर्स भारावले आणि कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू लागले. लोकांना हा व्हिडिओ भारीच आवडला असून हा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात आहे.
मुलीच्या लग्नात बायकोसह अरविंद केजरीवाल यांनी मारला ठुमका; पुष्पा 2 गाण्यावर केला धम्माल डान्स; Video Viral
पिल्लाचा हा क्युट व्हिडिओ @mydear_appukuttan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो एसी रूम मागत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण दरवाजा उघडला कोणी” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “उष्णता खूप आहे तो तरी काय करेल बिचारा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही