साप, अजगर, कोब्रा हे असे विषारी प्राणी आहेत ज्यांना दुरूनच पाहून प्रत्येकाची हवा टाइट होते. हे प्राणी आपल्या थरारक शिकारीसाठी ओळखले जातात. त्यांच्या विषाचा एक दंश जरी तुम्हाला लागला तर मात्र यातून तुमचे जिवंत बाहेर पडणे काही सोपे नाही. त्यांचा एक दंश तुम्हाला मृत्यूच्या दारी पोहचवण्यास पुरेसा आहे. यांच्यापुढे प्राण्यांचीच काय तर माणसांचीही काही चालत नाही. भलेमोठे प्राणी देखील या विषारी प्राण्यांना घाबरून असतात. त्यांच्या ताकदीचे असेच एके उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा आपल्याला थक्क करतात कधी हसवतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात मात्र सध्या जो व्हिडिओ इथे व्हायरल झाला आहे तो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक अजगर भल्यामोठ्या हरणाला जिवंत गिळताना दिसून येत आहे. व्हिडिओतील थरारक दृश्ये पाहून तुम्ही क्षणार्धात आवाक् व्हाल.
अतिशहाणपणा चांगलाच नडला! विनाकारण बैलाला नडू लागले काका मग बैलाने जे केलं… पाहूनच भरेल धडकी, Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला दिसेल की, इथे एक भलामोठा हरीण जमिनीवर पडलेला आहे. त्याच्या समोर एक अजगर देखील व्हिडिओत दिसून येत आहे. त्यातच अचानक हा अजगर आपले तोंड उघडतो आणि एखाद्या पिशवीत जसे सामान टाकावे तसे काही क्षणातच आपल्या तोंडात हरणाला सामावून घेतो. मुख्य म्हणजे, हरणाची ही शिकार अजगर अवघ्या काही सेकंदातच करतो जे पाहून अनेकजण आता अचंबित झाले आहेत. एवढेच काय तर व्हिडिओत आजूबाजूला काही माणसंही दिसत आहेत, जी या सर्व प्रकारची मजा लुटत असतात.
अंगाला सुटली खाज-हाताला नाही लाज! चालू स्कुटरने पेट घेताच तरुणाने केलं असं… Viral Video पाहून कपाळाला लावाल हात
अजगराच्या या थरारक शिकारीचा व्हिडिओ @animalsvault नावाने शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला बऱ्याच लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर एखादा साप खरच इतक्या वेगाने हे करत असेल तर आपले जीवन धोक्यात आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खोटं आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, तुझं जेवण कोणी खात नाही आहे भावा थोडा शांत हो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.