(फोटो सौजन्य: Instagram)
जंगलातील आयुष्य हे मानवांच्या आयुष्याहुन बरंच वेगळं असत. इथे नेहमीच अनेक वेगवेगळे आणि अनोखे व्हिडिओज शेअर केले जातात. जंगलातील हे अनोखे दृश्य इतकी मजेदार आणि दुर्लभ असतात की त्यांना पाहणे मनोरंजक ठरते आणि म्हणूनच फार कमी वेळेत हे व्हिडिओ व्हायरल होतात. इथे जंगलातील शिकारीचे अनेक थरार देखील शेअर केले जातात. सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो त्याच्या पुढे जंगलातील सर्व प्राणी नतमस्तक होतात पण सिंहाला घाबरताना कधी तुम्ही पाहिले आहे का? सिंहासारख्या बलाढ्य राजाचे भित्रे रूप सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात तो काही सिंहिणींना घाबरून स्वतःचा जीव वाचवताना दिसून आला आहे. हे दृश्य खरंतर कोणत्या चित्रपटाच्या सीनहुन कमी वाटत नाही. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात सिंहिणींचा एक ग्रुप जंगलातील मोकळ्या जागी आराम करत असल्याचे दिसते आणि याचवेळी तिथे जंगलाचा राजा म्हणजेच सिंहाची जबरदस्त एंट्री होते. हे दृश्य पाहून असे वाटते की, तो गुपचूप त्यांच्यात घुसून त्यांचे संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करत आहे पण तितक्यात एक सिंहीण त्याची ही चोरी पकडते आणि गर्जना करत त्याच्यावर हल्ला करू लागते. हे पाहताच बाकी सिंहिणीही रागाने पेटून उठतात आणि एकट्या सिंहाला अशा सिंहिणींच्या ग्रुपमध्ये घुसल्याचे पाहताच त्याला मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतात. सिंह हे सर्वच पाहून खूप घाबरतो आणि लगेच तिथून उठून पळायची तयारी करू लागतो. सिंह बचावासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो खरा पण सिंहिणींची संख्या इतकी जास्त असते की त्यांच्यासमोर त्याचे काहीच चालत नाही आणि अखेर त्याला तिकडून आला पळच काढावा लागतो. सिंहाची झालेली ही फजिती आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून युजर्स याची मजा लुटत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @thebigcatsempire नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सर्व जोडीदारांना नेहमी आनंदी ठेवणे कठीण! जीवनाचे धडे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांनी त्याला का घालवले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “म्हणून महिलांमध्ये कधी पडू नये”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.