(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Hurun India Rich List 2025:बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने आपल्या अभिनय कारकिर्दीच्या ३३ वर्षांनंतर एक नवा इतिहास घडवला आहे. तो आता अधिकृतपणे अब्जाधीश ठरला आहे. हुरून इंडिया रिच लिस्ट २०२४ नुसार, शाहरुख खानची संपत्ती ७,३०० कोटी होती. मात्र, २०२५ च्या ताज्या अहवालानुसार एका वर्षातच त्यांच्या संपत्तीत ५,१९० कोटींचा प्रचंड वाढ झाली आहे.यामुळे आता शाहरुख खानची एकूण संपत्ती १२,४९० कोटींवर पोहोचली असून, त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे.
हुरून इंडिया रिच लिस्ट २०२५ मध्ये भारतातील अनेक नामवंत कलाकारांचा समावेश आहे. या यादीनुसार, बॉलिवूडमधील ५ सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींची यादी अशी आहे.
पहिल्या क्रमांकावर शाहरुख खान आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर राणी मुखर्जीने आपली जागा मिळवली आहे. राणी आणि तीच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ७,७९० कोटी असून तिसऱ्या क्रमांकावर ऋतिक रोशन आहे, ज्यांची संपत्ती २,१६० कोटी आहे. तर चौथ्या क्रमांकावर १,८८० कोटी संपत्ती असलेल्या फिल्ममेकर करण जौहर आहे, तर पाचव्या क्रमांकावर १,६३० कोटी संपत्ती असलेले अमिताभ बच्चन आहेत.अनेक वर्षे भारताचा सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून शाहरुखचे नाव झळकत होते, पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, तो आता जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे.
‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
शाहरुख खान फक्त अभिनयातून पैसे कमवतो असे नाही. तर त्याची निर्मिती संस्थादेखील आहे. अभिनेत्याच्या संपत्तीत सर्वात मोठा वाटा रेड चिलीज एंटरटेनमेंटचा आहे. २००२ ला रेड चिलीज एंटरटेनमेंटची स्थापना करण्यात आली.गेल्या दोन दशकांमध्ये रेड चिलीज एंटरटेनमेंट या संस्थेने अनेक अशा चित्रपटांची निर्मिती केली, जे मोठ्या प्रमाणात गाजले. याबरोबरच, व्हीएफएक्स आणि डिजिटल उपक्रमांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या ही कंपनी ५०० हून अधिक लोकांना रोजगार देत आहे.भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात फायदेशीर उद्योगांपैकी एक म्हणून शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या संस्थेकडे पाहिले जाते. याबरोबरच, शाहरुख खान हा कोलकाता नाईट रायडर्स या क्रिकेट संघाचा जुही चावला आणि तिचा पती यांच्यासह भागीदार आहे.
‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक
शाहरुख खानला अलीकडेच नेशनल फिल्म अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या 2023 च्या चित्रपट ‘जवान’ साठी बेस्ट एक्टरचा पुरस्कार देण्यात आला आहे. 33 वर्षांच्या त्यांच्या सिनेमॅटिक कारकिर्दीत हा त्यांचा पहिला नेशनल अवॉर्ड आहे.