अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Car accident Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. तर कधी भयावह अपघाताचे (Accident Video) देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भयावह अपघाताचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामध्ये एका तरुणीला भरधाव वेगात कार चालवणे महागात पडलं आहे. यामुळे तिच्या गाडीचा चकणा-चूर झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका कार वाऱ्याच्या वेगाने येत आहे. कार अचानक एका खांबाला धडकते. चालकाचे नियत्रंण सुटल्याने कार एवढ्या जोरता धडकते की तरुणी गाडीतून बाहेर हवेत फेकली जाते. तर कारचे तुकडे-तुकडे होतात. हा व्हिडिओ पाहून बघणाऱ्यांचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. सुदैवाने तरुणीला कोणतीही गंभीर दुखापत झाले नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण कार हवेत तीन वेळी पलटूवन जोरात आदळेत, ज्यामुळे कारच्या खिडक्या, दारे सर्वकाही तुटून पडते. कार जमिनीवर धाडकन आदळते. ही घटना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली याची माहिती मिळालेली नाही. पण या घटनेने वाहतूकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहेत हे स्पष्ट होते.
व्हायरल व्हिडिओ
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @sunil_hathrasi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यापूर्वी देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका करा ड्रायव्हर झोपून आरामात गाडी चालवत होता. (Man Sleeping While Driving Truck) अलीकडे या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भरधाव वेगात गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे, चूकीच्या दिशेने जाणे, तसेच गाडी चालवताना स्टंटबाजी अशा अनेक कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.