थोडक्यात अनर्थ टळला! मेट्रोच्या दरवाज्यात चिमुकल्याचा हात अडकला; कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच अलीकडे अपघातांचे सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. काही अपघात इतके भयावह असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुबंईच्या गोरेगाव येथी बांगूर नगर मेट्रो स्टेशनवरी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका चिमुकल्यासोबत दुर्घटना होता होता टळली आहे. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगूर नगर मेट्रो स्टेशनवर एक चिमुकला एकटाच मेट्रोतून उतरतो. त्यानंतर तो पुन्हा आता जाण्याचा प्रयत्न करतो. पण याचे वेळी मेट्रोचे दार अचानक बंद होते. चिमुकल्याचे कुटुंब मेट्रोमध्ये असते. परंतु यामुळे मेट्रोमध्ये परत चढताना चिमुकला अडकला असता. पण स्टेशन अटेंडंट त्वरित ट्रेन ऑपरेटरला मेट्रो थांबवण्यास सांगतो आणि मुलाकडे धाव घेतो. मुलाला सुरक्षित मेट्रोपासून मागे घेतो. सुरक्षा कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा जीव वाचतो. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेट्रो कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या घटनेचे अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्टेशन अटेंडंटेचे नाव संकेत चोडणकर आहे. त्यांच्या हुशारी आणि तत्परतेला लोतांनी सलाम केला आहे. तसेच पालकांवर टीका केली आहे. पालकांना मुल संभाळता येत नाही का असे लोकांनी म्हटले आहे. एका युजरने गुड जॉब संकेत असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरेन प्रश्न असा आहे की, मुलगा ट्रेनमधून एकटा कसा उतरला? त्याचे पालक काय करत होते असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने शब्बास मित्रा! असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.