(फोटो सौजन्य: Twitter)
एका निष्पाप मुलीवर कुत्र्यांनी केलेल्या एका भयानक हल्ल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ हैदराबादचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे रस्त्यावर खेळणाऱ्या एका निष्पाप 4 वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला चढवला. यात कुत्र्यांनी मुलीच्या हातांचा चावा घेतला आणि नंतर तिला ओढून नेण्यास सुरुवात केली. घटना फार वेदनादायी असून यातील दृश्ये कुणाच्याही अंगावर काटा आणतील. आपल्यावर झालेल्या हल्ल्यापासून स्वतःला कसे वाचवायचे ते चिमुकलीला समजत नाही आणि ती जोरजोरात रडू लागते. श्वानांचा ग्रुप मात्र तिला फरफटत पुढे घेऊन जाऊ लागतो. यांनतर व्हिडिओत काय घडते ते जाणून घेऊया.
कुत्र्याच्या हल्ल्याचा एक भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गोल्डन हाईट्स कॉलनी, राजेंद्र नगरचा आहे. ज्यामध्ये एक मुलगी रस्त्यावर खेळत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी तरुणीवर हल्ला केला. दोन कुत्र्यांनी मुलीवर अशा प्रकारे हल्ला केला की त्यांनी तिचे हात ओरबाडले. यानंतर एका कुत्र्याने मुलीचा एक पाय जबड्यात पकडला आणि तिला ओढून नेण्यास सुरुवात केली. यांनतर कुत्र्यांनी केलेल्या या हल्ल्यादरम्यान मुलगी आरडाओरडा करू लागली. मुलीचा आवाज ऐकून शेवटी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक बाहेर आले आणि त्यांनी मुलीकडे धाव घेतली.
यानंतर नागरिकांनी श्वानांना तेथून पळवून लावले आणि चिमुकलीचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि आता हीच क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला कुत्र्यांना पळवून लावताना आणि मुलीला हात धरून जमिनीवरून उचलताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून स्पष्ट होते की, मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिला उभे राहण्यास आणि चालण्यास त्रास होत आहे. या संतापजनक घटनेने हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
Caught on #CCTV: A four-year-old girl suffered injuries after stray dogs attacked her at Golden Heights Colony, #Rajenderanagar here.
The incident occurred on Friday, when the girl was playing on the road. Hearing the screams of the girl, the locals chased away… pic.twitter.com/szlLi4C1pB
— NewsMeter (@NewsMeter_In) February 1, 2025
श्वानांच्या या भयानक हल्ल्याचा व्हिडिओ @NewsMeter_In नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली असून व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जीएचएमसी कस्टमर केअर जी कुत्र्यांच्या धोक्याची नोंदणी करते ती अत्यंत दयनीय आहे. फक्त ते म्हणतात, जर तुमचा प्रश्न सुटला नाही तर पुन्हा नोंदणी करा” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गोल्डन हाइट्स कॉलनीमध्ये कुत्र्यांचा त्रास, डासांचा त्रास मोठ्या प्रमाणावर आहे. जीएचएमसीसह कोणीही त्याची दखल घेत नाही, खरोखरच दयनीय आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.